Home Breaking News Chandrapur city@ news • वीज केंद्रातील अधिकारी व कुणाल कंपनीच्या विरोधात मारबतीसह...

Chandrapur city@ news • वीज केंद्रातील अधिकारी व कुणाल कंपनीच्या विरोधात मारबतीसह उलगुलान कामगारांनी काढला लक्षवेधक मोर्चा !

110

Chandrapur city@ news
• वीज केंद्रातील अधिकारी व कुणाल कंपनीच्या विरोधात मारबतीसह उलगुलान कामगारांनी काढला लक्षवेधक मोर्चा !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपुर :महाऔष्णिक वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांचे मागील चार दिवसांपासून साखळी उपोषण सुरू आहे.मात्र त्यांच्या आंदोलनाकडे वीज केंद्र प्रशासन व खासगी कंपनी असलेल्या कुणाल कंपनीने अजूनही लक्ष न दिल्याने त्यांचे उपोषण सुरूच आहे.अशातच आज शुक्रवारला आंदोलनकर्त्यांनी वीज केंद्रातील अधिकारी व खासगी कंपनी असलेल्या कुणाल कंपनी विरोधात मारबत काढून त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.

वीज केंद्रातील खासगी कंपनी असलेल्या कुणाल कंपनीत कंत्राटी पद्धतीने शेकडों कामगार काम करत आहेत.अशातच नियमानुसार या सर्व कामगारांचे पीएफ कपात करणे बंधनकारक असताना सुद्धा कुणाल कंपनीच्या व्यवस्थापनाने मागील सात वर्षांपासून कामगारांचे पीएफ कपात केले नाही. तर दुसरीकडे कामगारांचे वेतन सुद्धा 2 ते 3 महिने उशिरा देण्यात येत आहे. या सर्व गोष्टी कामगारांच्या लक्षात येताच त्यांनी राजू झोडे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या मंगळवार पासून साखळी उपोषण सुरू केले आहे.दरम्यान पीएफचे कपात न केल्याने यात लाखोंची अफरातफर झाल्याची बाब सुद्धा उघडकीस आली.

कुणाल कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नाही, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कापल्या जात नाही,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नाही, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची वारंवार धमकी सुद्धा दिल्या जाते.याविरोधात मेजर गेट समोर हे साखळी उपोषण सुरू आहे.आज शुक्रवारी आंदोलनकर्त्यांनी वीज केंद्रातील अधिकारी व खासगी कंपनी असलेल्या कुणाल कंपनी विरोधात मारबत काढून त्यांचा निषेध व्यक्त केला आहे.