Home Breaking News Gadchiroli dist@ news • केंद्र व राज्य सरकार सर्व सामान्य जनतेच्या हिताचे-खा....

Gadchiroli dist@ news • केंद्र व राज्य सरकार सर्व सामान्य जनतेच्या हिताचे-खा. अशोकजी ‌नेते •”आनंदाचा शिधा” वाटप कार्यक्रम

101

Gadchiroli dist@ news
• केंद्र व राज्य सरकार सर्व सामान्य जनतेच्या हिताचे-खा. अशोकजी ‌नेते
•”आनंदाचा शिधा” वाटप कार्यक्रम

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

गडचिरोली: शहरातील कॅम्प एरियातील रामपुरी येथे आज दिनांक 13 सप्टेंबरला पोळा सण तसेच गणेश चतुर्थी आगमना निमित्ताने आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रम पार पडला आनंददायी उत्सवासाठी नेहमीच राज्य व केंद्र सरकार सामान्य नागरिक जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असे मत खा. अशोक नेते यांनी या वेळी बोलताना व्यक्त केले.

राज्य सरकारने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे.या आनंद शिधा वाटपाच्या निमित्ताने गडचिरोली शहरातील रामपुरी येथे स्वस्त धान्य दुकानात खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते नागरिकांना आनंद शिधा वाटप करण्याचा कार्यक्रम पार पडला.

बाजारभावापेक्षा केवळ कमी दराने फक्त १०० रुपयांमध्ये रवा १ किलो, तेल १ पॉकेट, चनादाळ १किलो ,साखर १ किलो, असा पॅकेट किट मध्ये समावेश आहे. या आनंद शिधाचा नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी या बोलताना केले.