Chandrapur dist@ news
•प्रशिक्षकांनीच केली संस्थेची फसवणूक!
•पोलिस अधीक्षकांडे केली श्रध्दा किन्नाकेंनी चौकशीची मागणी!
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक
चंद्रपूर : जिल्ह्यात स्वयं सिध्दातंर्गत मुलींना कराटे प्रशिक्षण देण्याचा एक कार्यक्रम हाती घेण्यात आला होता.दरम्यान प्रशिक्षण देणा-या प्रशिक्षकांनी संस्थेची फसवणूक केल्याचा आरोप श्रध्दा किन्नाके यांनी केला असून त्यांनी या या बाबतीत सखोल चौकशी करण्याची मागणी एका लेखी तक्रारीतून चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकांकडे केली आहे.
फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या दरम्यान संपूर्ण राज्यांमध्ये जिल्हा परिषद शाळेतील मुलींना राणी लक्ष्मीबाई स्वसंरक्षण प्रशिक्षण हा उपक्रम राबविण्यात आला सदरहु उपक्रम राबवण्याकरिता स्किल ट्री कन्सल्टिंग प्राॅयव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत स्वयंसिद्धा संस्था चंद्रपूर यांना देण्यात आला.
स्वयंसिद्ध संस्था ही गेल्या आठ-दहा वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे. तद्वतच स्वयंसिद्धा संस्थेमार्फत चंद्रपूर जिल्ह्यातील 601 जिल्हा परिषद शाळेतील मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण देण्यात आले. उपरोक्त प्रक्षिशण चंद्रपूर जिल्हातील संपूर्ण 15 तालुक्यांत देण्यात आले असून त्यापैकी चिमुर, सिंदेवाही, राजुरा, नागभीड या चार तालुक्यांत प्रशिक्षण देण्याचे काम सुशांत इंदोरकर यांचे कडे देण्यात आले.
त्यांनी आपल्या कडे मोठ्या प्रमाणात प्रशिक्षक असल्याचे सांगितल्या मुळे त्यांना ते काम देण्यात आले .मात्र चार तालुक्यांमध्ये एकूण 182 शाळांसाठी प्रशिक्षण देण्याकरिता सुशांत इंदोरकर यांनी दिलेल्या प्रक्षिशकांच्या यादी नुसार फक्त 14 प्रक्षिशकांची नियुक्ती करण्यात आली. स्किल ट्री कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अटीनुसार एका प्रशिक्षकाला फक्त दहा शाळा शिकवणी वर्ग घेणे होत्या. तरी सुशांत इंदोरकर यांनी लालचे पोटी 30 शाळांची नोंदणी स्वतःच्या नावावर केली.शाळेमध्ये प्रशिक्षकांनी केलेले काम यामध्ये प्रशिक्षकांचे नाव न देता घरातील सदस्यांचे नाव देण्यात आले व त्यांच्या नावावर ते पैसे घेण्यात आले. श्रद्धा किन्नाके यांनी प्रशिक्षकांची वारंवार यादी मागितली असता त्यांनी ती दिली नाही. ज्या प्रशिक्षकांची यादी देण्यात आली त्या प्रशिक्षकांना त्यांच्या नावावर असलेल्या शाळेचे मानधन दहा शाळेप्रमाणे देण्यात आलेले आहे.
प्रत्यक्षामध्ये संस्थेकडून व जिल्हा परिषद विभागामार्फत पाहणी केली असता अनेक शाळांमध्ये प्रशिक्षण दिले नसल्याची माहिती या संस्थेला मिळालेली आहे. असे श्रद्धा किन्नाके यांचे म्हणणे आहे. प्रशिक्षकांना मिळणाऱ्या मानधना संबंधित जिल्हाप्रमुखाचा यात काही संबंध नाही कारण शाळेची उपस्थिती पत्रक कंपनीला देण्यात आल्या त्यानंतर कंपनीकडून सरळ प्रशिक्षकांच्या अकाउंटला ते मानधन देण्यात आलेले आहे. जिल्हा प्रमुखाला फक्त कंपनीकडून आलेल्या सूचना प्रशिक्षकापर्यंत पोहोचविणे व त्यांनी केलेल्या शाळेची माहिती कंपनीला देणे हे काम त्यांचे कडे देण्यात आलेले होते.ज्या शाळा सुशांत इंदुरकर यांनी प्रशिक्षणाकरिता घेतलेल्या होत्या त्या शाळेवरती प्रशिक्षण पूर्णपणे देण्यात आलेले नव्हते .कंपनीच्या अटीच्या विरोधात जाऊन त्यांनी स्वतःच्या नावावरती दहापेक्षा जास्त 30 शाळांची नोंदणी उपस्थिती पत्रकात केलेली आहे.
त्यामुळे दहा शाळेच्या वरती ज्या शाळा त्यांनी घेतलेल्या आहेत त्याचे मानधन त्यांना देण्यात आलेले नाही.संबंधित प्रशिक्षणाचे काम घेणारे सुशांत इंदोरकर यांचे वर कारवाई करण्याची मागणी संस्थेतर्फे जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून स्वयंसिध्दा संस्थेच्या जिल्हा प्रतिनिधी श्रद्धा किन्नाके यांनी नुकतीच केली आहे. कंपनीकडून आलेल्या प्रत्येक सूचना ह्या त्यांना देण्यात आलेल्या होत्या परंतु त्या ही पलिकडे जाऊन त्यांनी शाळेची संख्या स्वतःच्या व स्वतःच्या प्रशिक्षकांच्या नावावरती दहापेक्षा जास्त केलेली आहे.
शाळेमध्ये सदतीस सत्र म्हणजेच एक महिना सात दिवस प्रशिक्षण घेणे होते . एक व्यक्ती दोन महिन्यात तीस शाळा घेणे मुळीच शक्यच नाही .त्यामुळे कंपनीने फक्त एक प्रशिक्षक दहा शाळांना प्रशिक्षण देऊ शकतो ही अट नमूद करण्यात आलेली होती . दहा शाळेच्या वरती जर प्रशिक्षण करता शाळा घेण्यात आली तर त्याचे मानधन मिळणार नाही हे कंपनीने दिलेल्या सूचनेनुसार त्यांना सांगण्यात आलेले होते. लालची पोटी घेण्यात आलेल्या दहा शाळांच्या अटी पेक्षा जास्त शाळांची नोंद त्यांच्या नावावर उपस्थिती पत्रकात दिसल्यामुळे त्यांना उर्वरित शाळेचे मानधन देण्यात आलेले नाही. या पूर्वी सुचना दिल्या नंतर ही ते संस्थेला वारंवार मानधनाची मागणी करीत आहे . सदरहु उपक्रमात कंपनी , शासन व संस्थेची झालेल्या फसवणूकी संदर्भात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी जिल्हा प्रतिनिधी श्रद्धा किन्नाके व सहाय्यक प्रतिनिधी विद्या किनाके यांनी चंद्रपूरच्या पोलिस अधीक्षकांकडे एका लेखी तक्रारीतून केली आहे.