Home Breaking News Chandrapur city@ news • आ.किशोर जोरगेवारांच्या निवासस्थानी गणराया विराजमान! • स्वातंत्र्यपूर्व...

Chandrapur city@ news • आ.किशोर जोरगेवारांच्या निवासस्थानी गणराया विराजमान! • स्वातंत्र्यपूर्व काळापासून जोपासली जोरगेवार परिवारांनी गणेश उत्सवाची परंपरा !

131

Chandrapur city@ news
• आ.किशोर जोरगेवारांच्या निवासस्थानी गणराया विराजमान!
• स्वातंत्र्यपूर्व काळापासून जोपासली जोरगेवार परिवारांनी गणेश उत्सवाची परंपरा !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार
किशोर जोरगेवार यांच्या राजमाता निवासस्थानी दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील गणराया विराजमान झालेले आहे .आज मंगळवारला सकाळी ११ वाजता त्यांनी गणेश मुर्तीची विधीवत पुजा अर्चना करून स्थापना केली. यंदाचे हे ९३ वे वर्ष असुन जोरगेवार कुटुंबियांची दुसरी पिढी ही परंपरा कायम ठेवत आहे.
गणेशोत्सवाची महती जोरगेवार कुटुंबीयांनी मनाच्या गाभाऱ्यात समृद्ध धार्मिकतेने आणि भावपूर्ण श्रद्धेने जोपासली आहे.आज गणेश चतुर्थी निमित्त त्यांच्या निवासस्थानी गणराया विराजमान झाले. त्यांच्या या गणेश उत्सवाला ब-याच वर्षांची पंरपरा लाभली असुन ते स्वातंत्रपुर्व काळापासुन हा उत्सव सहपरिवार भक्तीभावाने व श्रध्देने साजरा करीत आहे.