Home Breaking News Chandrapur dist@ news •चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गणपती बाप्पाचे थाटात आगमन! •बाजारपेठही...

Chandrapur dist@ news •चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गणपती बाप्पाचे थाटात आगमन! •बाजारपेठही गर्दीने फुलली

70

Chandrapur dist@ news
•चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात गणपती बाप्पाचे थाटात आगमन!
•बाजारपेठही गर्दीने फुलली !
✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:शहरात दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी गणरायांचे आज थाटात आगमन झाले आहे.घरगुती गणपतीसह सार्वजनिक गणेश मंडळातही गणेशजीचे विराजमान झाले असल्याचे आज मंगळवारला शहराच्या काही भागात फेरफटका मारला असता दिसून आले.या वर्षी घरगुती गणपतीच्या संख्येत वाढ झाली असून गणेश मूर्तीच्या किंमतीत ही वाढ झाली असल्याचे अनेक भाविकांनी या प्रतिनिधीस आज एका भेटी दरम्यान सांगितले.दहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या निमित्ताने शहरातील बाजारपेठेत दोन दिवसांपासून भक्तगणांची चांगलीच गर्दी आहे.मध्यवर्ती भागात असलेली शहरातील गोल बाजार पेठ ही महिलांच्या गर्दीने अक्षरशः फुलली असल्याचे चित्र दृष्टीक्षेपात पडत आहे.एरव्ही स्वस्त दरात मिळणारी विविध रंगांची फुले व हारांच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे .या सोबतच हिरव्या भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत.गणेशोत्सव निमित्ताने मिठाईच्या दुकानात ग्राहकांची गर्दी असून शहरातील कायदा सुव्यवस्था व शांतता राखण्याच्या दृष्टीकोनातून चंद्रपूर पोलिस प्रशासन तर्फे शहरातील काही भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.गत वर्षि प्रमाणे यंदाही मनपा प्रशासनाने २५ कृत्रिम तलाव व १५ निर्माल्य कलश शहरांतील विविध भागात निर्माण केले असल्याचे दिसून आले. या गणेश उत्सवाच्या निमित्ताने चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील बाजार पेठेत ग्राहकांची व भाविकांची चांगलीच गर्दी दिसून आली.ग्रामीण भागातही पोलिस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला आहे.