Home Breaking News Ballarpur city @news • ॲड. पवन मेश्राम यांना “संविधान रत्न ” पुरस्कार...

Ballarpur city @news • ॲड. पवन मेश्राम यांना “संविधान रत्न ” पुरस्कार जाहीर

88

Ballarpur city @news
• ॲड. पवन मेश्राम यांना “संविधान रत्न ” पुरस्कार जाहीर

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

बल्लारपूर :- विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती पुणे तर्फे शहरातील ॲड. पवन मेश्राम यांना “संविधान रत्न ” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वकीलीचे शताब्दी वर्ष तसेच माता रमाईचे १२५ वे जन्मवर्ष साजरी करीत असताना त्या निमित्ताने “संविधान रत्न ” या पुरस्काराने सन्मानित करणार आहे. हा सन्मान दि. ०१ ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या कालावधीत भेगडे लॉन्स, वडगाव मावळ पुणे येथे प्रदान करण्यात येणार आहे.