Home Breaking News Ballarpur taluka@ news • बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावरील टोल नाक्यावर चालक दिवस साजरा

Ballarpur taluka@ news • बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावरील टोल नाक्यावर चालक दिवस साजरा

98

Ballarpur taluka@ news
• बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावरील टोल नाक्यावर चालक दिवस साजरा

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपूर

बल्लारपुर:चालक म्हणजे आपला जीव धोक्यात घेऊन आपल्याला क्षणोक्षणी योग्य आपल्या जागेवर पोहोचवणारा. चालक म्हणजे आपल्याला भासणाऱ्या प्रत्येक गरजू वस्तूंना वेळेवर आपल्यापर्यंत पोहोचवणार. चालक म्हणजे रस्त्यावर झालेल्या अपघातात जखमी झालेल्या इसमास योग्य वेळेवर दवाखान्यात पोहोचवणारा.
आपल्या घरच्यांची आपल्या परिवाराची चिंता न करता.अनेक दिवस आपल्या परिवाराला न बघता. प्रामाणिकपणे आपल्या कामाला जपणारा म्हणजे चालक.
परंतु त्याच चालकांनी न कळता एखाद्या इसमाला जर का दुर्घटना घडली. तर लोक त्या चालकाला बेधम्मा मारहाण करतात. परंतु त्याच्याच विपरीत आज बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावर असलेल्या बल्लारपूर वरोरा टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांच्या वतीने आज चालक दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित असलेले. वाहतूक नियंत्रण विभागाचे श्रीनिवास जेल्हावार, बल्लारपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील, अमाणूर अन्सारी, दिलीप कांचरलावर व विसापूर टोलनाक्यावरील संपूर्ण कर्मचाऱ्यांच्या वतीने. संपूर्ण येणाऱ्या जाणाऱ्या चालकांना मिठाई व पुष्पगुच्छ देऊन.
आज बल्लारपूर चंद्रपूर महामार्गावरील विसापूर येथील टोल नाक्यावर अशा रिते चालक दिवस साजरा करण्यात आला.