Home Breaking News Gadchiroli dist@ news •राजे अंब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथे श्री गणरायाची विधिवत...

Gadchiroli dist@ news •राजे अंब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथे श्री गणरायाची विधिवत पूजा करून केली प्रतिष्ठापना..!

110

Gadchiroli dist@ news
•राजे अंब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथे श्री गणरायाची विधिवत पूजा करून केली प्रतिष्ठापना..!

सुवर्ण भारत:शंकर महाकाली(संपादक)

गडचिरोली:अहेरी येथील राणी रुख्मिणी महल पटांगणात माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री गडचिरोली जिल्हा राजे अंब्रिशराव आत्राम यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या परिवारा सोबत श्री गणरायाची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केली.गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख-समृद्धी,समाधानाचे चांगले दिवस येऊ दे,गडचिरोली जिल्ह्याची प्रगती झपाट्याने होऊ दे यासाठी आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम गणरायाला घातले.

दरवर्षी प्रमाणे यंदाही माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या राणी रुक्मिणी महल पटांगणात गणरायांचे आगमन झाले. माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम त्यांच्या आई राजमाता रुख्मिणी देवी,लहान बंधू अवधेशबाब आत्राम यांनी श्री गणेशाची विधिवत पूजा व आरती केली.यावेळी माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांनी गडचिरोली जिल्ह्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.आजचा दिवस उत्साहाचा असून, विघ्नहर्ता गणरायाचे सर्वत्र आगमन झाले आहे.गेल्या वर्षी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा झाला होता.यावर्षी देखील गणेशोत्सव उत्साह आणि आनंदात साजरा होत आहे.

विशेष बाब म्हणजे यावर्षी अहेरीचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळा तर्फे माजी राज्यमंत्री तथा माजी पालकमंत्री राजे अंब्रिशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली 20 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर पर्यंत निशुल्क विविध स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहेत. त्यामध्ये एकल नृत्य, समूह नृत्य,लोकनृत्य/आदिवासी नृत्य,गायन स्पर्धा,भजन स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धा अशा अनेक स्पर्धा राजमहल अहेरी येथे घेण्यात येत आहेत आणि विजेत्या स्पर्धकांना राजेंच्या हस्ते विशेष पारितोषिक वितरण केले जाणार आहेत…!