Home Breaking News Chandrapur dist @news • अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश आठ दिवसांपासून सुरू होतेय...

Chandrapur dist @news • अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश आठ दिवसांपासून सुरू होतेय आंदोलन! •कामगारांवर अन्याय झाल्यास परत रस्त्यावर उतरु -राजु झोडे

53

Chandrapur dist @news
• अन्नत्याग आंदोलनाला अखेर यश आठ दिवसांपासून सुरू होतेय आंदोलन!
•कामगारांवर अन्याय झाल्यास परत रस्त्यावर उतरु -राजु झोडे

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर:गेल्या आठ दिवसांपासून मेजर गेट समोर सुरू असलेल्या वीज केंद्रातील कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश प्राप्त झाले असून कामगारांच्या खात्यात त्यांचे वेतन व पीएफचा भरणा झाला आहे . त्यामुळे सुरू असलेले अन्नत्याग आंदोलन आज मागे घेण्यात आले .यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांच्यासह वीज केंद्रातील वरिष्ठ अधिकारी व दुर्गापूर पोलिस ठाण्यातील अधिकारी उपस्थित होते. आंदोलनाला बसलेल्या कामगारांनी सुरू असलेल्या आंदोलनाला यश आल्याने त्यांनी आंदोलन स्थळी आनंदोत्सव साजरा केला.दरम्यान परत कामगारांवर अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरु असा इशारा राजू झोडे यांनी या वेळी बोलताना दिला .

कुणाल कंपनीत अनेक वर्षांपासून कंत्राटी कामगार काम करत आहेत.मात्र त्यांचे वेतन नियमित होत नव्हते, त्यांचे भविष्य निर्वाह निधी कपात केल्या जात नव्हती,कुशल कामगारांना वेतन वाढ दिल्या जात नव्हती, इतकेच नव्हे तर कुणाल कंपनीच्या ठेकेदाराकडून कामगारांना कामावरून काढून टाकण्याची धमकी सुद्धा वारंवार दिल्या जात असे.याविरोधात मेजर गेट समोर कामगारांचे हे साखळी उपोषण सुरू होते.मात्र त्यांच्या साखळी उपोषणकडे दुर्लक्ष केल्याने सोमवार पासून कामगारांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.अशातच गुरुवारी रात्री उशिरा वीज केंद्रातील अधिकारी व कुणाल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली व चर्चा केली.

यावेळी कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करत कामगारांच्या खात्यात त्यांचा थकीत पगार, त्यांचा पीएफचा भरणा केला.तसेच लेखी स्वरूपात मागण्यांची पूर्तता करीत असल्याचे लेखी लिहुन दिल्याने हे अन्नत्याग आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, रवि पवार, श्याम झिलपे, मंगेश बदकल , कुणाल चौधरी ,सुमित भिमटे, संपत कोरडे ,अक्षय काकडे, पंढरी टोंगे, आंनद पुणेकर, राहुल तुराणकर ,अभय सपाट, आशीष ठेगणे, गुरु भगत ,रविन्द्र मोटगरे ,पंचशील तामगाडगे, सुरज रामटेके यांच्यासह उलगुलान कामगार संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.