Home Breaking News Mul taluka@ news •मालधक्का तात्काळ हटवा अन्यथा रस्तारोको आंदोलन करु- राजु झोडेंचा...

Mul taluka@ news •मालधक्का तात्काळ हटवा अन्यथा रस्तारोको आंदोलन करु- राजु झोडेंचा प्रशासनाला इशारा

76

Mul taluka@ news
•मालधक्का तात्काळ हटवा अन्यथा रस्तारोको आंदोलन करु- राजु झोडेंचा प्रशासनाला इशारा

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

चंद्रपूर: जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील केळझर रेल्वे स्टेशनवर असलेला मालधक्का तात्काळ हटवावा अन्यथा गावकऱ्यांना सोबत घेऊन रस्ता रोको आंदोलन करु असा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व गावकऱ्यांनी दिला आहे. सोमवारला जिल्हाधिका-यांना या बाबतीत एक निवेदन सादर करण्यात आले आहे.यावेळी गावकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सुरजागड येथील लोह प्रकल्पातील आयरन मोठ्या प्रमाणात केळझर येथे ट्रकच्या माध्यमातून येत आहे.हे ट्रक गावच्या मधोमध चालत असून रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे.तर दिवसरात्र जड वाहतूक होत असून नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.केळझर येथे रेल्वेस्टेशन लगत व या परिसरात अनेक नागरिकांच्या शेतजमीनी आहेत. ट्रकांची ओव्हरलोड वाहतुक मोठ्या प्रमाणात या भागात वाढली असून प्रदूषणही वाढत चालले आहे.या शिवाय शेतकऱ्यांच्या शेतपीकांचेही प्रचंड नुकसान होत आहे. दरम्यान याच भागातील नागरिकांना विविध आजारांची लागण सुद्धा झाली आहे.

येथील सर्व समस्या व प्रश्न मागील अनेक दिवसांपासून शासन दरबारी पोहचविले आहे. परंतु प्रशासनाने आज पर्यंत कुठलीच दखल घेतली नाही.परिणामी समस्या जैसेथे आ वासून उभ्या आहेत. शासनाला जागे करण्यासाठी दि.10 ऑक्टोबर नंतर गावकऱ्यांना सोबत घेऊन केळझर गावात रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तसे निवेदन जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, सरपंच पुनम रामटेके, सुभाष रणदिवे, मनोज कोडापे, कैलाश घडसे,राजु लोणबले, निलेश मानकर,सरोज खोब्रागडे, पंचशील तामगाडगे उपस्थित होते