Home Breaking News —गौरी आलीय माहेरी—– 🟡◻️कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य ...

—गौरी आलीय माहेरी—– 🟡◻️कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य 🟣◻️ठाणे◽◽◽◽

248

—गौरी आलीय माहेरी—–

🟡◻️कु. मंगल शामराव मिसाळ सहज सुचलं सदस्य
🟣◻️ठाणे◽◽◽◽

सुवर्ण भारत:किरण घाटे(उपसंपादक)

गौरी आलीय माहेरी
भेटण्या आपुल्या आई
खेळण्या खेळ अंगणी
सासर हून ग बाई //१//

गौरी आलीय माहेरी
सोनियांच्या पावलांनी
घरांत मनात आनंद
वाहे पहा ओसंडूनी //२//

आली गौराई अंगणी
सोनं पावलांनी बाई
मिठ ,मोहरी ने तिची
नजर काढते आई //३//

आली गौराई अंगणी
दारी सजली रांगोळी
भासे जणू आज घरी
आहे दसरा दिवाळी //४//

आली गौराई अंगणी
भरजरी शालू नेसून
दाग दागिने घालून
रुप साजिरे दिसते छान //५//