Home Breaking News Chandrapur city@ news • गणपती बाप्पाला दिला चंद्रपूरकरांनी प्रेमाने निरोप ! ...

Chandrapur city@ news • गणपती बाप्पाला दिला चंद्रपूरकरांनी प्रेमाने निरोप ! •गणेश विसर्जनात अनेक मनमोहक व आकर्षक देखावे : नेत्रदीपक सोहळा बघण्यास भाविकांची रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी! •पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त!

96

Chandrapur city@ news
• गणपती बाप्पाला दिला चंद्रपूरकरांनी प्रेमाने निरोप !
•गणेश विसर्जनात अनेक मनमोहक व आकर्षक देखावे : नेत्रदीपक सोहळा बघण्यास भाविकांची रस्त्यांच्या दुतर्फा गर्दी!
•पोलिस प्रशासनाचा चोख बंदोबस्त!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:दहा दिवस भक्ती भावाने पूजा अर्चना करून आज मंगळवारला दुपारी 4 वाजता शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी वाजत गाजत आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला प्रेमाने निरोप दिला.हा नेत्रदीपक सोहळा बघण्यासाठी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील भाविकांची अलोट गर्दी लोटली होती .

ग्रामीण भागातील अनेक भक्तगण बाप्पाला निरोप देण्यासाठी आज शहरात आले होते. हे वृत्त लिहीपर्यंत शहरातील काही गणेश मंडळाची मुख्य मार्गाने मिरवणूक सुरूच होती.दरम्यान हा सोहळा अतिशय शांतमय पध्दतीने पार पडावा या साठी जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग तदवतचं मनपा प्रशासनाने शहरातील गणेश विसर्जनाचे उत्तम नियोजन केले होते.

दरवर्षि चंद्रपूरातील ही भव्य गणपती विसर्जन मिरवणूक दुपारी दोन वाजता सुरु होत होती.परंतु यंदा ही मिरवणूक फारच उशिरा सुरू झाली.दरवर्षि प्रमाणे चंद्रपूरातील काही खास सार्वजनिक गणेश मंडळांनी या विसर्जन मिरवणुकीत ज्वलंत विषयावर आकर्षक देखावे सादर करुन चंद्रपूरकरांचे अक्षरशः लक्ष वेधले.मनपा प्रशासनाने घरगुती गणरायाचे विसर्जन करण्यासाठी शहरातील विविध भागात 25 कृत्रिम तलाव निर्माण केले होते.

अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यासाठी मुख्य मार्गावर स्वागत मंडप उभारले होते.तर काही संघटनांनी भक्तगणांना आज महाप्रसादाचे वितरण केले.ठिकठिकाणी पानपोई सोबतच एक रुपयात चहाची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलिस बंदोबस्तात अप्पर पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक,या शिवाय पुरुष पोलिस व महिला पोलिस होमगार्ड,दंगा नियंत्रण पथक, नक्षल विरोध अभियान पथक ,शीघ्र कृती दल , एसआरपीएफ टीम ठेवण्यात आली होती.आज रात्री उशिरा पर्यंत गणरायांचे विसर्जन होण्याची शक्यता असल्याचे भक्तगणांत बोलल्या जाते.