Home Breaking News Chandrapur city@ news •ACB च्या जाळ्यात अडकलेल्या लाचखोरास न्यायालयाने सुनावली शिक्षा

Chandrapur city@ news •ACB च्या जाळ्यात अडकलेल्या लाचखोरास न्यायालयाने सुनावली शिक्षा

183

Chandrapur city@ news
•ACB च्या जाळ्यात अडकलेल्या लाचखोरास न्यायालयाने सुनावली शिक्षा

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर : जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील विहीरगाव साजाचे तत्कालीन पटवारी दिलीप रामभाऊ अल्गुनवार यांना एका लाच प्रकरणातील गुन्ह्यात नुकतीच न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे.
६५ वर्षिय तत्कालीन पटवारी दिलीप रामभाऊ अल्गुनवार
यांचे विरुद्ध दाखल लाचेच्या खटल्यात दि. २५ सप्टेंबरला जिल्हा न्यायाधिश क्रमांक ०४ तथा चंद्रपूर अतिरिक्त सत्र न्यायाधिश वि .वाय.फड यांनी आरोपी अल्गुनवार यांना कलम ७ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकमध्ये ०२ वर्ष, सजा व ५,०००/- रु. दंड, दंड न भरल्यास ३ महिने कारावास, कलम १३(२) मध्ये ५ वर्ष सजा व ५,०००/- रू. दंड, दंड न भरल्यास ६ महिने कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
तक्रारदार जगदीश काशिनाथ हेटकर यांनी आपल्या पत्नीचे नावाने खरेदी केलेल्या मौजा विहीरगाव येथील भुमापन क्र.१०७ ही शेत जमीन खरेदी केली होती. सदरहु शेत जमीनीचे फेरफार करून तक्रारदार यांचे पत्नीचे नावाने नविन सातबारा तयार करून देण्याकरिता आरोपी दिलीप अल्गुनवार तत्कालीन तलाठी साजा क्र.०३. विहीरगाव यांनी २०००/- रू. लाचेची स्पष्ट मागणी करून स्वतःच रक्कम स्विकारली. आरोपीने लोकसेवक पदाचा दुरूपयोग करून स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता वाम व भ्रष्ट मार्गाने तक्रारदाराकडून २०००/- रूपयांची लाच स्विकारतांना रंगेहात मिळुन आल्याने पोलिस स्टेशन पाथरी जि. चंद्रपुर येथे दिनांक ०९/०१/२०१५ रोजी अप क्र. ३००१/२०१५ कलम ७,१३(१) (ड) सहकलम १३(२)ला प्र.का. १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उपरोक्त प्रकरणाच्या तपासाअंती गडचिरोली ला.प्र.वि.चे तत्कालीन पोलिस निरीक्षक डी.डब्लु. मंडलवार यांनी तपास पूर्ण करून विशेष खटला क्रमांक १२/१५ अन्वये चंद्रपूर विशेष न्यायालयात न्यायप्रविष्ठ केला होता.
सदरहु प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता देवेंद्र महाजन यांनी अभ्यासपूर्वक युक्तीवाद करून या लाचखोरास चपराक बसविण्यास अत्यंत मोलाचे काम केले असुन पुराव्याची बाजु भक्कमपणे मांडली.या शिवाय लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपुरचे पोलिस अधिक्षक राहुल माकणीकर ,अपर पोलिस अधिक्षक संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात चंद्रपुर कार्यालय प्रमुख पोलिस उपअधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले व पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांचे मार्गदर्शनात कोर्ट पैरवी पोहवा अरूण हटवार यांनी काम पाहिले.
वरील निकालामुळे लाचखोर अधिकारी व कर्मचा-यांवर निश्चित परिणाम होईल व भ्रष्टाचारालाआळा बसेल .चंद्रपुर जिल्ह्यातील जनतेंनी अश्या भ्रष्टाचाराविरूध्द जास्तीत जास्त पुढाकार घेवुन तक्रार द्यावी असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केले आहे .लाचेची मागणी करित असल्यास नागरिकांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपुरचे कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक ०७१७२-२५०२५१ अथवा टोल फ्री क्रमांक १०६४ या वर संपर्क साधावा.