Home Breaking News Chandrapur dist@ news •धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात येवू नये -अशोक...

Chandrapur dist@ news •धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात येवू नये -अशोक उईके

201

Chandrapur dist@ news
•धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात येवू नये -अशोक उईके

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चंद्रपूर:धनगर समाजाला आदिवासी समाजामध्ये आरक्षण देण्यात येवू नये अश्या आशयाची मागणी बिरसा क्रांती दलचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक अशोक उईके यांनी केली आहे. दरम्यान काल दि.३ ऑक्टोंबरला त्यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मार्फत देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्म यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

अनुसूचित जमाती आदिवासी आरक्षणा मध्ये धनगर किंवा कोणत्याही अन्य जातीचा समावेश करण्यात येवू नये.टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोसिएल सायन्सने महाराष्ट्र शासनाकडे या आधी तसा अहवाल दिलेला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सादर केलेल्या निवेदनाची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे पाठविण्यात आले असल्याचे उईके यांनी आमच्या प्रतिनिधीशी आज बोलताना सांगितले. चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करताना प्रामुख्याने बिरसा क्रांती दलचे जिल्हाध्यक्ष अशोक उईके, ओंकार गेडाम, दिवाकर, मेश्राम,मनोहर मेश्राम, विद्यासागर मेश्राम,लता पोरते,रेखा कुमरे, रामप्रसाद मडावी उपस्थित होते.