Home Breaking News Chandrapur dist@ news •काग ते नांदारा पाणंद रस्ता खनिजकर्म निधीतून मंजुर करा-...

Chandrapur dist@ news •काग ते नांदारा पाणंद रस्ता खनिजकर्म निधीतून मंजुर करा- रोखठोक कामगार संघटनेचे तालुका प्रमुख अशिद मेश्राम यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

144

Chandrapur dist@ news
•काग ते नांदारा पाणंद रस्ता खनिजकर्म निधीतून मंजुर करा- रोखठोक कामगार संघटनेचे तालुका प्रमुख अशिद मेश्राम यांची चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:उपसंपादक

चिमुर : तालुक्यातील काग ते नांदारा हा पाणंद रस्ता शेतकऱ्यांना शेतीवर जाण्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पावसाळ्यात या रस्त्यावरुन शेतीवर जाण्यासाठी शेतकऱ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.

गेल्या तीन वर्षांपासुन काग ते नांदारा पाणंद रस्त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या कार्यालयात रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे तालुकाप्रमुख अशिद मेश्राम हे सातत्याने पाठपुरावा करत आहेत.परंतु अद्याप त्यांचे प्रयत्नाला यश प्राप्त झाले नाही.शेतकरी वर्गांची समस्या डोळ्यांसमोर ठेवता प्रहार रोखठोक कामगार संघटनेचे चिमूर तालूका प्रमुख अशिद मेश्राम यांनी आज मंगळवार दि. 04 ऑक्टोबरला चंद्रपूरचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर केले.

तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडून त्यांना सकारात्मक प्रतिसाद देत पहिल्या टप्प्यातील प्रस्तावात खनिजकर्म निधीतून रस्ता मंजुर करु असे अश्वासन तालुकाप्रमुख अशिद मेश्राम यांना दिले आहे.