Home Breaking News Chandrapur dist@ news • आयटकचे उपोषण सुरुच ! • क्वाॅर्टर वाटप...

Chandrapur dist@ news • आयटकचे उपोषण सुरुच ! • क्वाॅर्टर वाटप संदर्भात कामगार संघटनेत व व्यवस्थापनात वाद पेटला !

264

Chandrapur dist@ news
• आयटकचे उपोषण सुरुच !
• क्वाॅर्टर वाटप संदर्भात कामगार संघटनेत व व्यवस्थापनात वाद पेटला !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:वरोरा लगतच्या वेकोली माजरी परिसरात असलेल्या वसाहतीत घर वाटपाचा वाद चांगलाच ऱंगला असून व्यवस्थापन आपली सातत्याने मनमानी करीत असल्याचा आरोप कामगार संघटनेने केला आहे.दरम्यान तीन दिवसांपासून महाव्यवस्थापक कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात झाली आहे.आज सोमवारला हे साखळी उपोषण असेच सुरू असल्याचे दिसून आले.निवास क्रमांक A/289 वेकोली माजरी येथील नागलोन पाटाळा भाग दोनच्या खुल्या खाणीतील कर्मचा-यांना व्यवस्थापकाने वाटप केल्याचा आरोप असून या बाबत संताप व्यक्त केल्या जात आहे.आयटक संघटनेच्या वतीने या बाबतीत वारंवार सुचना केल्या नंतर ही व्यवस्थापनने या कडे काळजीने लक्ष पुरविले नाही.घर वाटपा संदर्भात झालेली हेराफेरी संदर्भात आयटक संघटनेने आपला बुलंद आवाज उठवित उपोषणाला सुरुवात केली आहे.व्यवस्थापनाचा मनमानी कारभार सुरू असून योग्य न्याय मिळण्यासाठी कामगार संघटनाने उपोषणासारखे पाऊल उचलले आहे.जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहण्याचा निर्धार आयटकने घेतला आहे.दरम्यान आज या प्रतिनिधीने उपोषण मंडपाला भेट दिली असता मंडपात कामगार युनियनचे अध्यक्ष विजय वासाडे ,सुदाम ठक ,सुरेश हेमके, राजेश गद्दल बसुन असल्याचे दिसून आले.दोन दिवस विजय वासाडे यांनी या ठिकाणी आमरण उपोषण केले असून ‌सध्या याच मंडपात साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे.