Home Breaking News Chandrapur dist@ news • जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला गटप्रवर्तक व आशा...

Chandrapur dist@ news • जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला गटप्रवर्तक व आशा वर्करांचा भव्य आक्रोश मोर्चा!

75

Chandrapur dist@ news
• जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला गटप्रवर्तक व आशा वर्करांचा भव्य आक्रोश मोर्चा!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक संघटना संलग्न आयटकच्या वतीने गट प्रवर्तक कर्मचारी यांना कंत्राटी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी,वार्षिक वेतन वाढ,अनुभव बोनस तर आशा वर्करला किमान वेतन,दिवाळी भाऊबीज आणि ऑनलाईन कामावर बहिष्कार या मागणीसाठी आशा वर्कर व गटप्रवर्तक यांनी आझाद बगीचा येथून काल दुपारी 1 वाजता केंद्र व राज्य सरकार विरोधात तीव्र नारेबाजी करत चंद्रपूर जिल्हा परिषद कार्यालयवर मोर्चा काढला यानंतर मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना निवेदन देऊन येत्या 17 तारखे पर्यंत मागण्या मंजूर न झाल्यास महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा वर्कर व गट प्रवर्तक कृती समिती द्वारे दि.18 ऑक्टोंबर पासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाण्याची नोटीस दिली आहे .

आंदोलनाचे नेतृत्व कॉ. विनोद झोडगे राज्य सचिव आयटक, कॉ.प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव भाकप , कॉ.दिलीप बर्गी जिल्हा अध्यक्ष आयटक, कॉ रवींद्र उमाटे कार्याधक्ष, कॉ.राजू गैनवार जिल्हा संघटक, कॉ प्रदीप चीताडे अध्यक्ष संयुक्त खदान मजदुर संघ संलग्न आयटक कॉ .निकीता निर जिल्हा सचिव आशा वर्कर संघटना, कॉ.फरजना शेख जिल्हा अध्यक्ष कॉ ममता भिमटे संघटन सचिव, कॉ सुहासनी वाकडे , कोंडू ताई रोहनकर गट प्रवर्तक संघटना, वर्षा घुमे,शीतल जांभुळे,शालू लांडे,सविता गटलेवार ,यांनी केले.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांची नेमणूक झाल्यापासून दिवसें दिवस ऑनलाईन व ईतर विना मोबदला कामाचा दबाब वाढवण्यात येत आहे. अल्प मोबदल्यात काम करणाऱ्या स्वयंसेविका स्वतः विधवा, घटस्फोटीत किंवा ज्यांची आर्थिक बाजू कमकुवत आहे अशा असून वाढत्या महागाईच्या काळात प्रपंच चालवणे कठीण होत आहे. त्यामुळे दि. 3 ऑक्टोबर पासून महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक कृती समितीने राज्यभर विविध मागण्या करता आंदोलन सुरू केले आहे.

त्या अनुषंगाने आयटकच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयवर विराट मोर्चा काढून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी विविध प्रमुख व स्थानिक मागण्या करण्यात आल्या.ज्यामधे गट प्रवर्तक कर्मचा-यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन शासकीय वेतन श्रेणी व भत्ते लागू करावेत.जोपर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा दिला जात नाही तोपर्यंत त्यांना कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वेतनश्रेणी देण्यात यावी.

तसेच कंत्राटी कर्मचाऱयांना लागू असलेली वार्षिक वेतन वाढ 5 टक्के व अनुभव बोनस 15 टक्के देण्यात यावा या खेरीज गट प्रवर्तक यांना प्रवास भत्ता देण्यात यावा. आशा वर्करला किमान वेतन ,दिवाळी भाऊबीज दहा हजार रु.लागू करण्यात यावी. आशा वर्कर व गट प्रवर्तक यांनाऑनलाईन कामे करण्याची शक्ती करू नये,विना मोबदला व कर्तव्य सूचित नसलेले कामे सांगू नये.बुलढाणा जिल्ह्यातील आमठाना प्राथमिक आरोग्य केंद्रातील घाटनांद्रा येथील आशा वर्कर रत्नाताई लिंगाडे यांचा 7 ऑक्टोंबर रोजी ऑनलाईन व विना मोबदला कामाच्या टेन्शन मुळे मृत्यू झाला आहे या बाबतीत दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी.

आरोग्य खात्यातील 50 टक्के रिक्त जागा पात्रतेनुसार आशा व गट प्रवर्तक मधून भरा. कोरोना काळातील ग्रामपंचायत स्तरावरून , मार्च 2020 ते ऑक्टोंबर 2022 पर्यंत थकीत देण्यात येणारा दरमहा हजार रुपये त्वरित देण्यात यावा.आभा कार्ड,गोल्डन इत्यादी कार्ड काढण्याची शक्ती करण्यात येऊ नये.गटप्रवर्तक यांचा आशा सुपरवायजर नामोल्लेख करण्यात यावा.

सी एच ओ नसलेल्या सब सेंटर मधील आशा वर्करला आरोग्य वर्धिनीचा निधी मेडिकल ऑफिसरच्या सहीने देण्यात यावा. शासकीय सुट्टीचे दिवशी लाभार्थीची माहिती मागवू नये,विना मोबदला कामे सांगू नये,जुलै पासूनचे थकीत वाढीव मानधन त्वरित देण्यात यावे,संघटने सोबत दर तीन महिन्यांनी राज्य,जिल्हा व तालुका पातळीवर समस्या निवारण बैठक घेण्यात यावी.यासह विविध मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जिल्हा भरातील हजारो आशा वर्कर व गट प्रवर्तक उपस्थित होत्या.