Home Breaking News Chandrapur dist@ news • केळझर मालधक्याच्या विरोधात गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन! •...

Chandrapur dist@ news • केळझर मालधक्याच्या विरोधात गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन! • उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात झाले आंदोलन! •मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा राजु झोडेंचा प्रशासनाला इशारा !

77

Chandrapur dist@ news
• केळझर मालधक्याच्या विरोधात गावकऱ्यांचे रस्ता रोको आंदोलन!
• उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात झाले आंदोलन!
•मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा राजु झोडेंचा प्रशासनाला इशारा !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मूल: तालुक्यातील केळझर येथील मालधक्याच्या विरोधात गावकऱ्यांनी आज मंगळवारला उलगुलान संघटनेच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केले.

सुरजागड कंपनी , लोयड्स मेटल्स कंपनी या शिवाय स्थानिक प्रशासनाच्या विरोधात नागरिकांनी तीव्र रोष व्यक्त केल्याचे घटनास्थळी दिसून आले .दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न देखील या वेळी केला.त्यांनतर मूल पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांची काही वेळाने सुटका केली. जोपर्यंत गावकऱ्यांच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी घेतला होता त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार व लोयड्स मेटल्सचे कर्मचारी यांनी गावकऱ्यांच्या मागण्या मान्य करू तसेच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

सुरजागड येथील लोह प्रकल्पातील आयरन मोठ्या प्रमाणात केळझर येथे ट्रकच्या माध्यमातून आणल्या जात आहे.हे ट्रक गावच्या मधोमध चालत असून रस्त्यांची अक्षरशः दुर्दशा झाली आहे.तर दिवसरात्र जड वाहतूक होत असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.केळझर येथे रेल्वेस्टेशन लगत व परिसरात अनेक नागरिकांच्या शेत जमीनी आहेत. परिणामी ट्रकच्या ओव्हरलोड वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे प्रचंड नुकसान होत आहे.इतकेच नव्हे तर अनेक नागरिकांना विविध आजारांची लागण सुद्धा झाली आहे.
या सर्व समस्या मागील अनेक दिवसांपासून शासन दरबारी मांडल्या गेल्या.मात्र प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.परिणामी समस्या जैसे थे असून शासनाला जागे करण्यासाठी मंगळवारी राजू झोडे यांनी गावकऱ्यांना सोबत घेऊन केळझर गावात रास्ता रोको आंदोलन केले . यावेळी गावकऱ्यांचा रोष बघता मूल येथील उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले.दरम्यान आंदोलकांना ताब्यात सुद्धा घेतले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी व कंपनी व्यवस्थापनाने गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य, प्रदूषण, शिक्षण, शेत पिंक नुकसान भरपाई व अन्य समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले त्यानंतर राजू झोडे यांनी निवेदन देत आंदोलन मागे घेतले.मागण्यांची पूर्तता न झाल्यास येत्या काही दिवसात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला आहे.यावेळी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे, सरपंच पुनम रामटेके, सुभाष रणदिवे, श्रीकांत घोनमोडे, श्याम झिलपे,मनोज कोडापे, कैलाश घडसे,राजु लोणबले, डेविड खोब्रागडे,निलेश मानकर,सरोज खोब्रागडे, सुरेश फुलझले,पंचशील तामगाडगे व गावकरी उपस्थित होते.