Home Breaking News ◻️🏵️◻️… मोह….◻️🏵️ ◻️🌺◻️सौ. ऋचा हनुमंत महाबळ, सिंधुदुर्ग

◻️🏵️◻️… मोह….◻️🏵️ ◻️🌺◻️सौ. ऋचा हनुमंत महाबळ, सिंधुदुर्ग

80

◻️🏵️◻️… मोह….◻️🏵️

◻️🌺◻️सौ. ऋचा हनुमंत महाबळ, सिंधुदुर्ग

सुवर्ण भारत:किरण घाटे(सह संपादक)

मोह अगदी दोन अक्षरी शब्द पण त्याची व्याप्ती किती मोठी. व्यक्ती परत्वे मोह बदलतो, कुणाला पैश्याचा मोह, कुणाला जमिनीचा, कुणाला दाग दागिन्यांचा, कुणाला इस्टेटीचा मोह, सारे जग या मोहावर जगते, कधी कुठल्या क्षणी कशाचा मोह होईल आणि आपण फसले जाऊ काही कळत नाही. तारुण्यात मोह अधिक असतो, वय वाढते तसे कळू लागत की जीवन क्षण भंगूर आहे, आपण कितीही गोळा करून ठेवले तरी एका क्षणात मरण येताच हे सार इथेच टाकून जायचे आहे, मला गाण्याच्या काही ओळी या वेळी आठवल्या

“सजन रे झूट मत बोलो
खुदा के पास जाना है ”
तुम्हारे मेहेल चौबारे यही
रह जायेंगे सारे
अकड किस बात प्यारे
ये सर फिर भी झुकाना है
सजन रे झूट मत बोलो…..

हे गाणे प्रसिद्ध गायक मुकेशजी यांनी गायिले, गीतकार व “तिसरी कसम “या चित्रपटाचे प्रोडूसर शैलेंद्रजी यांनी जीवनाचे सार या गीतात मांडले व शंकर जयकिशन यांनी संगीतबध्द केलेले अजरामर असे हे गीत आजही लोकांच्या मुखात असते.

या गाण्यात जीवनाचा अर्थ दडला आहे आणि स्पष्ट केल आहे, अरे वेड्या! तु काय सगळं जपत बसलास हे इथेच टाकून तूला जग सोडून जायचे आहे, हाथी, घोडे कितीही लवजमा असला अगदी राजा असला, कोटी रुपये जवळ असले म्हणून मरण चुकायचे नाही, मग हा मोह कशासाठी करायचा.

पण मानवाला हेच कळत नाही अगदी कपडे, दाग दागिने, इस्टेट, रुपये सार जपत जवळ करून ठेवतो कारण मोह. यातुन देव ही सुटले नाहीत आपण कोण? अशी ही मोह नगरी भल्या भल्या माणसाचे आयुष्य बरबाद करते. या मोहापायी विनाशच होतो पण म्हणतो ना “कळते पण वळत नाही “अशी परिस्थिती असते.

जावे त्याच्या वंशा त्यालाच कळे असे काहीसे होऊन जाते. हा मोह मानवाचा पिच्छा सोडत नाही, कुठल्याही रूपात जीवनात दाखल होतो व मानवाला राक्षस बनवतो, बाप रे काय महिमा या “मोहाचा”?