Home Breaking News Ghugus city @news • घुग्घुस येथील पंचशील चौकातील विहार सुंदर बनवा

Ghugus city @news • घुग्घुस येथील पंचशील चौकातील विहार सुंदर बनवा

118

Ghugus city @news
• घुग्घुस येथील पंचशील चौकातील विहार सुंदर बनवा

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घुस: येथील भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा (पंचशील चौक) येथे आयुष्यमान कवडू लटारु रामटेकेजी हे घुग्घुस शहरातील व बौद्ध समाजातील पहिले कस्टम आफिसर झाले.तसेच पंचशील चौकातील बौद्ध समाज बांधवांनी त्याचे स्वागत, सत्कार करण्यात आले.
आयुष्यमान कवडू रामटेकेजी यांनी घुग्घुस येथील बौध्द स्मशानभूमी भेट देवून त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.तसेच बौद्ध स्मारक समिती, नवनिर्माण महामानव ड्रा.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.समाज बांधवाकडून सत्कार करण्यात आला.

आयुष्यमान कवडू रामटेकेजी यांनी शिक्षणाविषयी मार्गदर्शन केले व विहार बांधकामास आर्थिक मदत करेल असे त्यांनी म्हटले होते, त्यांनी दि.१३ऑक्टोबर २०२३ शुक्रवार रोजी त्यांनी विहारास एक लाख रु दान देण्यात आले, एकून त्यांनी एक लाख पाच हजार रुपये [१०५०००रु.] दान दिले आहे. आयुष्यमान कवडू लटारू रामटेकेजी हे घुग्घुसचे रहिवासी होते त्यांचे प्राथमिक शिक्षण घुग्घुस ला झाले U.P.S.C. परीक्षा पास करुण कस्टम ऑफिसर झाले रामटेके ॲडिशनल कमिशनर कस्टमर ऑफिसर म्हणून रिटायर झाले आहे.सध्या मुंबईचे रहिवासी आहे,

आयुष्यमान कवडू रामटेके म्हनाले की,मी मुंबईला राहुण सुद्धा समाजाला मदत करेल व विहार खूप सुंदर बनवा मी तुमच्यासोबत आहे,जेव्हा – जेव्हा समाजासाठी मदत लागेल तेव्हा-तेव्हा मी करेल.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा नगर शाखा घुग्घुसचे सदस्य,यशोदरा महिला मंडळाचे सदस्य,बौद्ध स्मशान भूमिचे सदस्य, समाज बांधव,परिसरातील नागरिक उपस्थित होते.