Chandrapur dist@ news
• देवराव भोंगळे यांच्या हस्ते “लेडीज कार्नर” प्रतिष्ठानाचे उद्धघाटन
सुवर्ण भारत:पंकज रामटेके
उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर
घुग्घुस : येथील जामा मशीद जवळील “लेडीज कार्नर” या नवीन प्रतिष्ठानाचे उद्धघाटन शनिवार १४ ऑक्टोबर रोजी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.
याप्रसंगी माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प.सभापती नितु चौधरी, प्रयास सखी मंच घुग्घुसच्या मार्गदर्शिका अर्चना भोंगळे, भाजपाचे विनोद चौधरी यांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.
माजी भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी प्रतिष्ठानाच्या मेश्राम कुटुंबियांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या.
यावेळी लेडीज कार्नरच्या संचालिका माला मेश्राम, अरुण मेश्राम, अभिनव मेश्राम, अशोक वाघमारे, उपेंद्र कांबळे, रोहित जैस्वाल, असगर खान उपस्थित होते.
