Home Breaking News Gadchiroli dist@ news • अफाट गर्दीच्या साक्षीने ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे...

Gadchiroli dist@ news • अफाट गर्दीच्या साक्षीने ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे अभिष्टचिंतन! •सांस्कृतिक व मनोरंजनाची मोठी मेजवानी •सिनेअभिनेत्री मुग्धा गड़सेची उपस्थिती शुभेच्छाचे अक्षरशः पाऊस पडले!

36

Gadchiroli dist@ news
• अफाट गर्दीच्या साक्षीने ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे अभिष्टचिंतन!
•सांस्कृतिक व मनोरंजनाची मोठी मेजवानी

•सिनेअभिनेत्री मुग्धा गड़सेची उपस्थिती शुभेच्छाचे अक्षरशः पाऊस पडले!

✍️रोशनी बैस
सुवर्ण भारत:उपसंपादक

अहेरी:- राज्याचे अन्न व ओषध प्रशासन मंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धर्मराव बाबा आत्राम यांचे शुक्रवार 20 ऑक्टोबर रोजी वाढदिवस होते, त्या निमित्याने अहेरी येथील खमनचेरु रोडवरील स्नेहा लॉनच्या भव्य मैदानावर अफाट गर्दीच्या साक्षीने वाढदिवसाचे केक कापून मोठ्या जल्लोशात वाढदिवस साजरा करण्यात आले. यासाठी सिनेअभिनेत्री मुग्धा गड़से यांचीही उपस्थिती होती.
यावेळी व्यासपीठावर सत्कारमूर्ती म्हणुन मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम, अभिनेत्री मुग्दा गड़से, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, पंचायत समितीचे माजी सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, रा.काँ.पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविन्द्र वासेकर, माजी जि.प.सदस्य नाना नाकाडे, सिआरपीएफ 9 बटालियनचे कमांडंट राजेश्वर एस. बाळापुरकर, 37 बटालीयनचे कमांडट मोहनदास एच. खोब्रागडे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्नेहा लॉनच्या भव्य मैदानावरील देखण्या मंडपात ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवसाचे केक कापून वाढदिवसाचे ऐतिहासिक अभिष्टचिंतन सोहळा संपन्न झाले. यासाठी युवा नेते ऋतुराज हलगेकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांनी पुढाकार घेतले.
अभिष्टचिंतन सोहळ्यात ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे लाडूतुलाही करण्यात आले. हनुमानचा गदा भेट देऊन भलामोठा हार गळ्यात चढविन्यात आले. वाढदिवसाचे शुभेच्छा, पुष्पगुच्छ व फुलांचा अक्षरशः पाऊस व एकप्रकारे महापुरच वाहत होता. अहेरीच्या उपजिल्हा रुग्णालयात वाढदिवसाच्या निमित्याने महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. तसेच विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमेही राबविन्यात आले.
सुरेंद्र अलोणे यांच्या संकल्पनेतुन चित्रकार सुजल बछार यांनी मंत्री ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे छायाचित्र रांगोळीने हुबेहुब रेखाटले व ते देखने व आकर्षनाचे केंद्र होते. सोबतच ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे पोस्टर व शार्ट फिल्मही रिलीज करण्यात आले.
महाराष्ट्राचा हास्यकल्लोळ व नृत्याचा नजराणा या कार्यक्रमात फार मोठी सांस्कृतिक मेजवानी झाली. एकंदरीत कार्यक्रमाने डोळ्याचे पारणे फिटले. आयोजकांच्या वतीने महाभोजनही देण्यात आले. यावेळी चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांची अलोट गर्दी होती.