Home Breaking News Chandrapur dist@ news • सिमेंट कंपन्यांचा कामगारवर अन्याय होऊ देणार नाही :...

Chandrapur dist@ news • सिमेंट कंपन्यांचा कामगारवर अन्याय होऊ देणार नाही : माजी .खा. नरेश पुगलिया

27

Chandrapur dist@ news
• सिमेंट कंपन्यांचा कामगारवर अन्याय होऊ देणार नाही: माजी.खा.नरेश पुगलिया

सुवर्ण भारत:संजय घुग्लोत(उपसंपादक)

चंद्रपुर:राजुरा कोरपना तालुक्यातील उपरवाही अंबुजा सिमेट प्रकल्प अदानी समूहाच्या ताब्यात गेल्यानंतर कामगार व अधिकाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. त्यांना जबरदस्तीने स्वेच्छानिवृत्ती घ्यायला भाग पाडले जात आहे. काही अधिकाऱ्यांना निरूपयोगी ठरवून त्यांना कामावरून काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. अंबुजा सिमेंट कामगार संघटनेच्या कार्यालया समोर कामगार नेते तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांच्या नेतृत्वात सभेचे आयोजन केले.
या सभेचे प्रास्ताविक एल.अँड टी सिमेंट कामगार संघाचे महासचिव साईनाथ बूचे यांनी केले. तर मार्गदर्शक कामगार युनियनचे कार्याध्यक्ष शिवचंद काळे, व अंबुजा सिमेंट ऑफिसर असोसिशनकडून शर्मा यांनी व्यथा व्यक्त केली.
या विराट सभेला नरेशबाबू यांनी संबोधित करतांना म्हंटले की ही दडपशाही रोकण्याकरिता यासंदर्भात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना पत्र पाठविले. या कडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. यापूर्वी, सुरेशचंद्र निओटया, नरोत्तम सक्सेरिया आणि मेसर्स होलसीम या कंपनीने अंबुजा प्रकल्प चालविला. तेव्हा कर्मचारी व्यवस्थापन, कार्यपद्धती अतिशय उत्कृष्ट होती. मागील एका वर्षांपासून जिल्ह्यात अदानी समूह अंबुजा आणि ए.सी.सी सिमेंट प्रकल्प कार्यान्वित आहे. या अल्प कालावधीत अदानीच्या अधिकान्यांनी १९ व्यवस्थापन अधिकाऱ्यांना श्रेणी- १ मध्ये टाकले. पन्नास हून अधिक अधिकाऱ्यांना निरुपयोगी ठरविले आहे. या संदर्भात अंबुजाच्या कार्मिक विभागाने कोणतेही लेखी पत्र दिले नाही. उलट राजीनामा देण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात आहे.
यापूर्वी अधिकाऱ्यांना अशी वागणूक व्यवस्थापनाने कधीच दिली नाही.
अदानी समूह अशाच पद्धतीने सुरू राहिला तर औद्योगिक शांतता आणि सुसंवाद राखणे कठीण होईल यावर्षी व्यवस्थापनाने कामगारांसाठी स्वेच्छानिवृत्ती योजना सुरू केली. यासंदर्भात व्यवस्थापनाने कामगारांशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही. यातील बरेचशे कामगार अधिकारी प्रकल्पग्रस्त आहे. व्यवस्थापनाची अशीच वर्तणूक राहिल्यास कंपनीची. प्रतिष्ठा धुळीस मिळू शकते. कामगार व अधिकारी वर्ग यांनी एकजूट पणे राहणे गरजेचे आहे. कामगारावर व अधिकारी वर्गावर अन्याय होत असेल तर भविष्यात मोठा लढा उभारणार असे मत व्यक्त केले.

याप्रसंगी सागर बल्की, वसंत मांढरे, तारासिंग कलशी, चंद्रशेखर पोडे, गजानन गावंडे, अशोक नागापुरे, देवेंद्र बेले, अविनाश जाधव, राधाबाई आत्राम, ऑफिसर्स असोसियन चे अधिकारी वर्ग, कामगार युनियनचे बल्की, उत्तम उपरे, बाळू गवारे, रामरतन पांडे, तर आभार प्रदर्शन, अजय मानवटकर, यांनी केले

तसेच एल अँड टी सिमेंट कामगार संघ अल्ट्रटेक सिमेंट, एसी सी चांदा सिमेंट वर्क्स युनियन, मराठा सिमेंट वर्क्स, कामगार संघटना, अंबुजा सिमेंट, मुरली सिमेंट वर्क्स, कंत्राटी कामगार संघटना दालमिया माणिकगड सिमेंट गडचांदुर चे पदाधिकारी, व ऑफसर असोसिएन अधिकारी वर्ग, महिला वर्ग, व मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते.