Home Breaking News Bramhpuri taluka@ news • डॉ.अक्षय आडकिने यांनी केली लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण

Bramhpuri taluka@ news • डॉ.अक्षय आडकिने यांनी केली लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण

33

Bramhpuri taluka@ news
• डॉ.अक्षय आडकिने यांनी केली लोकसेवा आयोगाची परिक्षा उत्तीर्ण

✍️रवि चामलवार
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी

ब्रम्हपुरी : देलनवाडी वार्ड येथील डॉ चांगदेव आडकिने सहा. पशुधन विकास अधिकारी यांचा मुलगा डॉ. अक्षय आडकिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या पशुधन विकास अधिकारी गट अ परीक्षेत यश संदान केले आहे. डॉ अक्षय आडकिने यांचे वडील सहा. पशुधन विकास अधिकारी या पदवार असून आई सौ रजनी आडकिने गृहीनी आहे. डॉ अक्षय आडकीने यांनी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून यश संपादन केले आहे.

डॉ अक्षय आडकिने यांचे प्राथमीक शिक्षण जिल्हा परिषद शाळा चातगाव ता.धानोरा जि. गडचिरोली येथे पुर्ण केले. व वर्ग ५वी ते १० वी पर्यंतचे शिक्षण नेवजाबाई हितकारणी बाईज स्कुल व ११वी ते १२ नेवजाबाई कॉलेज येथे पूर्ण केले. १२ वी नंतर निट मधे यश संपादन करून शासकीय पशुवैद्यकिय महाविद्‌यालय नागपुर येथे पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

परभणी येथील महाविदयालयातून पोल्ट्री शाखेतून पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केले. डॉ अक्षय आडकिने सध्या पुणे येथील ॲव्हिकेट कंपनीत टेक्नीकल स्पेशालीस्ट या पदावर कार्यरत आहेत. याचा जिल्हयात १ ला व राज्यात ९६ वा नंबर आहे.
जि‌द्दीच्या जोरावर यश प्राप्त केल्याचे डॉ.अक्षय यांनी बोलतांना सांगीतले.