Home Breaking News Chandrapur dist@ news • रास्त मागण्यांसाठी आरोग्य अधिकारी, कर्मचारी,गटप्रवर्तक व आशाचा संप...

Chandrapur dist@ news • रास्त मागण्यांसाठी आरोग्य अधिकारी, कर्मचारी,गटप्रवर्तक व आशाचा संप 18 व्या दिवशी सुरुच ! • घोषणाबाजीने‌ वातावरण दुमदुमूले! •जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आयटकचा ठाम निर्णय!

55

Chandrapur dist@ news
• रास्त मागण्यांसाठी आरोग्य अधिकारी, कर्मचारी,गटप्रवर्तक व आशाचा संप 18 व्या दिवशी सुरुच !
• घोषणाबाजीने‌ वातावरण दुमदुमूले!
•जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आयटकचा ठाम निर्णय!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:विविध रास्त मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों आरोग्य अधिकारी, कर्मचारी गटप्रवर्तक व आशा वर्कर्स आज शुक्रवारला दुपारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरू असलेल्या आंदोलनात स्वयंस्फूर्तीने सहभागी झाल्याचे दिसून आले.राष्ट्रीय आरोग्य अभियानात चार हजार गट प्रवर्तक व सत्तर हजार आशा वर्कर्स गेल्या १८वर्षां पासून कार्यरत असून त्यांच्या शासन दरबारी ब-याच मागण्या प्रलंबित आहेत.गटप्रवर्तकांना प्रवास भत्ता देण्यात यावा , त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, सामाजिक सुरक्षा लागु करावी , किमान वेतन लागू करावे , या शिवाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या काही रास्त मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. विविध मागण्यांसाठी आयटकने संपावर जाण्याचा निर्णय या आधीच घेतला आहे.दरम्यान शुक्रवारी झालेल्या आंदोलनात चंद्रपूर जिल्ह्यातील शेंकडों आरोग्य अधिकारी कर्मचारी आशा वर्कर्स व गटप्रवर्तक सहभागी झाल्याचे दिसून आले.उपरोक्त संप यशस्वी करण्याचे आवाहन आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे यांनी या पूर्वीच केले आहे .आज झालेल्या घोषणाबाजीमुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर अक्षरशः दणाणून गेला होता.