Home Breaking News Chandrapur city@ news • प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे...

Chandrapur city@ news • प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे येत्या 8 नोव्हेंबरला चंद्रपूरात “धरणा” आंदोलन

52

Chandrapur city@ news
• प्रलंबित मागण्यांसाठी
राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे येत्या 8 नोव्हेंबरला चंद्रपूरात “धरणा” आंदोलन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर: प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात शासन आश्वासने देतात परंतु मागण्या मान्य करीत नाही.त्यामुळे कर्मचारी वर्गात नाराजीचा सुर उमटला आहे.दरम्यान राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर व जिल्हा परीषद महासंघाच्या वतीने “माझे कुटुंब माझी पेन्शन” या शिर्षाखाली इतर 18 मागण्यांकडे शासनाचे लक्षवेधण्यासाठी बुधवार दि. 8 नोव्हेंबर 2023 ला चंद्रपूर येथे राज्य सरकारी व जिल्हा परिषद कर्मचारी यांचे धरणा आंदोलन करणार आहेत.

नवीन पेन्शन योजनेमुळे गेली १७ वर्षे राज्यातील कर्मचारी-शिक्षक नाडले गेले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे भविष्यच उध्वस्त झालेले आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना (OPS) सर्वांना लागू करा, शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करणे बंद करा, शैक्षणिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे बंद करा, आरोग्य विभागातील अनेक रिक्त पदे तात्काळ भरा यासह अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी माझे कुटुंब, माझी पेन्शन या शीर्षाखाली १८ मागण्यांच्या आग्रहासाठी उभारलेले हे धरणा आंदोलन आहे तसेच दि. १४ डिसेंबर २०२३ पासून राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर जाण्यासाठी व सरकारप्रती क्षोभ व्यक्त करण्याच्या अनुषंगाने हे आंदोलन महत्वपूर्ण आहे.

या धरणा आंदोलनात जिल्हा तथा तालुकास्तरावरील सर्व राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परीषद कर्मचारी, तसेच इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे जास्तीत जास्त संख्येने सहभागी होवून आपल्या हक्क व अधिकारासाठी लढा द्यावा असे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजु धांडे, कोषाध्यक्ष संतोष अतकारे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.