Home Breaking News Chandrapur city@ news • शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज चंद्रपूरात आंदोलनस्थळी...

Chandrapur city@ news • शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज चंद्रपूरात आंदोलनस्थळी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे “चटणी भाकर” खाओ आंदोलन! •पाचशे पेक्षा अधिक कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आंदोलनस्थळी उपस्थित! •शहरातील अनेक सामाजिक व कामगार संघटनांनी दिला “या” आंदोलनाला पाठिंबा! •आंदोलनकर्त्यांची या वर्षिची दिवाळी अंधारातच

250

Chandrapur city@ news
• शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज चंद्रपूरात आंदोलनस्थळी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे “चटणी भाकर” खाओ आंदोलन!
•पाचशे पेक्षा अधिक कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आंदोलनस्थळी उपस्थित!

•शहरातील अनेक सामाजिक व कामगार संघटनांनी दिला “या” आंदोलनाला पाठिंबा!

•आंदोलनकर्त्यांची या वर्षिची दिवाळी अंधारातच

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:गेल्या काही दिवसांपासून आरोग्य विभागातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचा-यांचे राज्यभर बेमुदत आंदोलन सुरू असून चंद्रपूर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था पूर्णता कोलमडली असल्याचे बोलल्या जाते .दरम्यान आज त्यांच्या या संपाचा 19 वा दिवस असून सदरहु संपामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णांचे बरेच हाल होत आहेत.एकिकडे महाराष्ट्रभर दिवाळी उत्सव सर्वत्र साजरा होत असताना आरोग्य विभागातील कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचारी मात्र आपल्या रास्त व न्याय मागण्यांसाठी रस्त्यावर उतरले असल्याचे चित्र काही दिवसांपासून चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रत्यक्षात बघावयास मिळत आहे.
आंदोलनाला एव्हढे दिवस होवून देखील या कडे शासनाने जातीने लक्ष पुरविले नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल .
दरम्यान आंदोलनकर्त्यांत आता शासनाविरोधी रोष निर्माण झाल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आज झालेल्या घोषणाबाजीतून स्पष्ट झाले आहे.सरकारचे धोरण या बाबतीत चुकीचे असून आरोग्य सेवेत अठरा वर्षे काम करणारे कंत्राटी कर्मचारी आहे . शासनाने त्यांच्या कामांचे मूल्यमापन करणे गरजेचे आहे.

सरकारची दिवाळी तुपाशी परंतू कंत्राटी कर्मचारी मात्र उपाशी अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्याचे रविन्द्र उमाटे यांनी आज या प्रतिनिधीशी चंद्रपूर मुक्कामी बोलताना म्हटले आहे.

ऐन दिवाळीच्या दिवसात क्षुल्लक मागण्यांसाठी आरोग्य अधिकारी व कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे . परंतु सरकार त्यांच्या रास्त व प्रलंबित मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे .त्यामुळे आज सोमवारला राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांनी चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (आंदोलनस्थळी) चटणी भाकर खाओ आंदोलन करुन चंद्रपूरकरांसह शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.

◆कृती समिती आंदोलन तीव्र करणार ◆
कृती समितीच्या सभासदांनी शासनाचा निषेध करीत आज आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी केली.

जोपर्यंत आमचे समायोजन होणार नाही.व समान काम समान वेतन मिळणार नाही .तोपर्यंत आम्ही आरोग्य अधिकारी व कर्मचारी कामावर जाणार नाही .असा निर्धार त्यांनी केला असल्याचे मूख्य समन्वयक राष्ट्रीय आरोग्य अभियान समायोजन अधिकारी व कर्मचारी कृती समिती जिल्हा चंद्रपूरचे रविन्द्र उमाटे यांनी या वेळी या प्रतिनिधीशी बोलताना आज सांगितले.आजच्या आंदोलनात डॉ. शिल दुधे , डॉ.कुंभलकर ,डॉ .तिरथ उराडे , डॉ .अक्षय बुरलावार ,डॉ.तुषार अगडे ,वनिता मेश्राम , आराधना झाँ, देवला मानापुरे ,डॉ .विनोद फुलझेले , डॉ .पवन डेकाटे ,सुरज डुकरे , ललिता मुत्यालवार, शालिनी वनकर ,मंदा बनकर ,रजनी धापटे, एन.एल.धुरिया ,सपना कोतपल्लीवार ,सुषमा शिरभय्ये व अन्य पाचशे पेक्षा अधिक आरोग्य अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.