Home Breaking News Chandrapur city@ news • जप्त केलेले अवैध रेतीचे वाहन पळवून नेणा-या चालकाविरुद्ध...

Chandrapur city@ news • जप्त केलेले अवैध रेतीचे वाहन पळवून नेणा-या चालकाविरुद्ध चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशनला महसूल प्रशासनाची तक्रार दाखल

146

Chandrapur city@ news
• जप्त केलेले अवैध रेतीचे वाहन पळवून नेणा-या चालकाविरुद्ध चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशनला महसूल प्रशासनाची तक्रार दाखल

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:अवैध रेती वाहतूकीवर अंकुश तथा दंडात्मक कारवाई करण्यासाठी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाभर महसूल पथक निर्माण केले आहे .या पथकात प्रामुख्याने नायब तहसिलदार, वरिष्ठ लिपिक,मंडळ अधिकारी, पटवारी व कोतवाल यांचा समावेश आहे.अश्यातच चंद्रपूर महसूल पथकाचे प्रमुख नायब तहसिलदार राजू धांडे,मंडळ अधिकारी विशाल कोरेवार व अन्य पथकातील कर्मचारी वर्गांने दोन दिवसांपूर्वी चंद्रपूर रामनगर पोलिस स्टेशन जवळील एका वर्दळीच्या मुख्य रस्त्यावर रेतीचे एक अवैध वाहन जप्त केले होते.ते वाहन जप्तीनामा व पंचनामा करून प्रशासकीय भवन परिसरात ठेवण्यात आले होते.परंतु त्या परिसरात जप्तीत ठेवण्यात आलेले ते वाहन काही तासांतच पळून नेल्याची घटना घडली अन् अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्याच्या महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली.घटनेची माहिती होताच कर्तव्यदक्ष नायब तहसिलदार राजू धांडे यांनी घटनास्थळी भेट दिली.व त्या वाहनाची पाहणी केली .तद्वतच त्यांनी घटनेचे गांभिर्य लक्षात घेताच तहसिलदार विजय अर्जुन पवार यांच्या कानावर ही बाब टाकली .लगेच नायब तहसिलदार धांडे यांनी रामनगर पोलिस स्टेशनला लेखी तक्रार दाखल केली. उपरोक्त घटनेतील अवैध रेतीचे वाहन हिंगणघाट येथील वाहन चालक वैभव किसनाजी लेदे यांच्या कडुन जप्त करण्यात आले होते.
त्या वाहनाचा क्रमांक MH 32 Q 9769 असा असून त्या वाहनात 10 ब्रास अवैध रेती असल्याचे समजते.दंडात्मक कारवाई पोटी वाहन मालकास साडे तीन ते चार लाख दंड रुपये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिस स्टेशनला तक्रार दाखल होताच रामनगर पोलिस पथक घटनेतील वाहन पळविणाराचा शोध घेत आहे.हे वृत्त लिहीपर्यत त्या वाहन चालकाचा पोलिसांना शोध लागला नव्हता. नायब तहसिलदार राजू धांडे यांच्या या धडक कारवाईमुळे पठाणपूरा व अन्य ठिकाणच्या अवैध रेती तस्करांत चांगलीच धडक भरली.हे मात्र तेवढेच खरे!