Home Breaking News Chandrapur city@ news • खासगी रुग्णालयातील कामगारांचा मिनिमम वेजेस नुसार त्यांचा पगार...

Chandrapur city@ news • खासगी रुग्णालयातील कामगारांचा मिनिमम वेजेस नुसार त्यांचा पगार बॅंकेत जमा करावा व रूग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावावी:महेश हजारेंची मागणी

74

Chandrapur city@ news
• खासगी रुग्णालयातील कामगारांचा मिनिमम वेजेस नुसार त्यांचा पगार बॅंकेत जमा करावा व रूग्ण हक्काची सनद दर्शनी भागात लावावी:महेश हजारेंची मागणी

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर: जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात वेगवेगळ्या पदावर कामगार कार्यरत आहेत. परंतू अनेक खासगी रुग्णालयात मिनिमम वेजेस नुसार पगार दिला जात नाही. बारा तास काम करून देखील कामाचा योग्य मोबदला मिळत नाही.

त्यामुळेच रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना लेखी निवेदनातून उपरोक्त मागणी आज केली आहे.त्यांनी निवेदनात नमूद केले आहे कि खाजगी रुग्णालयातील सर्वच कामगारांना मिनिमम वेजेस नुसार पगार बॅकेत जमा करावा.
तसेच कामगारांची इलेक्ट्रॉनिक पंचिंग मशीनद्वारे हजेरी लावावी.
या शिवाय याच जिल्ह्यातील सर्वच खासगी रुग्णालयात रूग्ण हक्काची सनद प्रथम दर्शनी भागात स्थानिक भाषेत लावावी. जेणेकरुन विविध खर्चाची माहिती रुग्णालयात येणा-या रूग्णांना व नातेवाईकांना
मिळेल.

जे रूग्णालय नियमाचे पालन करणार नाही त्या रूग्णालयाचा परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी देखील रोखठोक प्रहार कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश हजारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याचे त्यांनी या प्रतिनिधीला एका भेटीत सांगितले.