Home Breaking News Chandrapur city @news • कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपाला चंद्रपुर...

Chandrapur city @news • कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपाला चंद्रपुर जिल्हा तथा महानगर आम आदमी पार्टीचा पाठिंबा.

119

Chandrapur city @news

• कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपाला चंद्रपुर जिल्हा तथा महानगर आम आदमी पार्टीचा पाठिंबा.

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी यांचे सरसकट समायोजन करा आणि समान काम समान वेतन त्यांना द्या या मागणीला घेऊन कंत्राटी कर्मचारी यांचे मागील अनेक दिवसांपासून चंद्रपूरात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला आम आदमी पार्टी चंद्रपुर जिल्हा तथा महानगर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी आज भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या तदवतचं या आंदोलनाचे मुख्य समन्वयक रविंद्र उमाटे यांना नुकतेच आंदोलनस्थळी समर्थन पत्र दिले.

आरोग्य विभागात आपले कर्तव्य बजवणाऱ्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे अनेक दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. त्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत काम करण्याऱ्या अनेक शासकीय अधिकाऱ्यांवर व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा व्याप आल्याने त्याचा परिणाम सामान्य जनतेवर पडत आहे .अनेक ठिकाणी आरोग्य कर्मचारी नसल्याने रुग्णांचे हाल होत आहे.

ऐन दिवाळीच्या दिवसांत क्षुल्लक मागण्या घेऊन आरोग्य सेवा देणारे अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आहे.  त्यांच्या मागण्या या रास्त असून गेल्या 18 वर्षा पासून ते कंत्राटी म्हणुन कार्यरत आहे. समायोजन सोबत समान काम समान वेतन देण्यात यावे कारण काम सारखे , पद सारखे पण दाम कमी आहे. समर्थन देताना आप सोशल मीडियाचे प्रमुख राजेश शंकर चेडगुलवार यांनी समायोजनला होत असलेल्या विलंबाबत तीव्र शब्दात रोष व्यक्त केला आहे.
अधिवक्ता तब्बसुम शेख यांनी सांगितले की कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना काळात अविरत सेवा दिली .

पण सरकारला आरोग्य कर्मचाऱ्यांचे दुःख दिसत नाही ते या कडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे . महानगर अध्यक्ष योगेश गोखरे म्हणाले की दिल्ली आणि पंजाब मध्ये कंत्राटी कर्मचा-यांना सेवेत कायम केले असून महाराष्ट्र सरकार का बर यांना सेवेत कायम करू शकत नाही असा प्रश्न देखील या निमित्ताने त्यांनी उपस्थित केला आहे. कोरोना योद्धांच्या समस्यांचे प्रशासनाने तातडीने निराकरण करून त्यांच्या रास्त असलेल्या मागण्या त्वरित पूर्ण करून पूर्ववत त्यांना कामावर घ्यावे व आरोग्य यंत्रणा सुरळीत सुरू करुन सर्वसामान्य जनतेचे हाल थांबवावे अन्यथा जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने आगामी हिवाळी अधिवेशनात अधिकारी आणि कर्मचारी यांना सोबत घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. समर्थन पत्र देताना राजू कुडे , संतोष बोपचे ,तब्बसूम शेख ,सुनील सदभय्या ,स्वप्नील घागरगुंडे , सुधीर पाटील व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.