Home Breaking News Chandrapur dist@ news • राजू आत्राम यांच्या आमरण उपोषणाला भारतीय कम्युॅनिस्ट पक्षाचे...

Chandrapur dist@ news • राजू आत्राम यांच्या आमरण उपोषणाला भारतीय कम्युॅनिस्ट पक्षाचे समर्थन

159

Chandrapur dist@ news
• राजू आत्राम यांच्या आमरण उपोषणाला भारतीय कम्युॅनिस्ट पक्षाचे समर्थन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:येथील स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भद्रावती तालुक्यातील माजरी येथील राजु आत्राम यांनी काही दिवसांपासून रास्त व प्रलंबित मागण्यांसाठी आपले आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना पुर्नवसनासाठी वेकालीने आश्वासन दिले होते. आमसभेचा तसा ठराव देखिल आहे. परंतु आजपर्यंतही वेकोली प्रशासनाने दिलेला शब्द पाळला नाही. उलट आता पुनर्वसन होणार नाही असे ठणकावून सांगीतले जाते. हा माजरी गावातील लोकांवर एक प्रकारे सारासार अन्याय आहे.असे रविन्द्र उमाठे यांचे म्हणणे आहे.दरम्यान याच अन्यायाच्या विरोधात भारतीय कम्युॅनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काँ. प्रकाश रेड्डी , काँ. रविंद्र उमाठे कॉ. पी. एम. गोटे यांनी नुकतीच आत्राम यांच्या उपोषण मंडपाला भेट दिली .

येत्या 20 तारखेपर्यंत तोडगा न निघाल्यास वेकोली प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन उभे करून एकही गाडी जागेवरून हलू देणार नाही व कोळसा उत्पादन करू देणार नाही .असा इशारा भारतीय कम्युॅनिस्ट पक्षाचे काॅ.रविन्द्र उमाठे यांनी दिला आहे.