Home Breaking News Ballarpur city@ news • दिवाळी निमित्त लाभार्थ्यांना उज्वला गॅस कनेक्शनचे वाटप

Ballarpur city@ news • दिवाळी निमित्त लाभार्थ्यांना उज्वला गॅस कनेक्शनचे वाटप

611

Ballarpur city@ news
• दिवाळी निमित्त लाभार्थ्यांना उज्वला गॅस कनेक्शनचे वाटप

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

बल्लारपूर :- शहरातील सरदार पटेल वार्डात दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर 48 लाभार्थ्यांना उज्वला गॅसचे कनेक्शन वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा भाजपचे वरिष्ठ नेते चंदनसिंह चंदेल यांच्या शुभहस्ते हरीश शर्मा भाजपा जिल्हा अध्यक्ष (ग्रामीण) यांच्या प्रमुख उपस्थितीत वितरित करण्यात आले.
यावेळी उपस्थित लाभार्थ्यांसोबत संवाद साधण्यात आले. भाजपचे शहर अध्यक्ष काशिनाथ सिंह, भाजयूमो शहर अध्यक्ष ॲड. रणजयसिंह, विश्वजीत सिंह चंदेल, अमन सिंह चंदेल, श्रीमती साखरा बेगम, नबी अहमद, कार्यक्रमाचे आयोजक सलीम नबी अहमद, कैलाश गुप्ता प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मिथलेश खेंगर यांनी केले. यावेळी वीरेंद्र श्रीवास, सुधाकर शिक्का, प्रशांत दारला, आबिद भाई, प्रमोद बनिया इत्यादींनी उपस्थिती दर्शविली.