Home Breaking News Ballarpur city@ news •स्व.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवारांच्या जयंती निमित्त बल्लारपूर नगरीत होतेय जिल्हास्तरीय पुरुष...

Ballarpur city@ news •स्व.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवारांच्या जयंती निमित्त बल्लारपूर नगरीत होतेय जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी सामन्यांचे आयोजन ! •विजेत्या टीमला देणार आयोजक पुरस्कार! •पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचा संयुक्त उपक्रम!

331

Ballarpur city@ news
•स्व.डॉ.सच्चिदानंद मुनगंटीवारांच्या जयंती निमित्त बल्लारपूर नगरीत होतेय जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी सामन्यांचे आयोजन !
•विजेत्या टीमला देणार आयोजक पुरस्कार!

•पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लबचा संयुक्त उपक्रम!

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

बल्लारपूर : येत्या १७ ते १९ नोव्हेंबरला बल्लारपूर
नगरीतील दादाभाई नौरोजी फॅक्टरी मैदानावर हौशी जिल्हा कबड्डी असोसिएशन चंद्रपूर व श्री.सुधीरभाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर यांच्या संयुक्तीक विद्यमाने डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांच्या जयंती निमित्त भव्य जिल्हास्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

सदरहु स्पर्धेतील सामन्यात प्रथम पारितोषिक रोख २०,००० रुपये तर द्वितीय पारितोषिक १५,००० रुपये ठेवण्यात आले आहे. या शिवाय महिला गटाला १२,००० रुपयांचे प्रथम पारितोषिक तर ७,००० रुपयांचे द्वितीय पारितोषिक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेतील सर्व सामने मॅटवर होतील. स्पर्धेत मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा समितीचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, उपाध्यक्ष सुधाकर सिक्का, आकाश चौधरी, सचिव शशिकांत मुंडे, कोषाध्यक्ष कमल वर्मा, विनोद कोवे यांनी एका प्रसिध्दी पत्रकातून केले आहे.