Home Breaking News Chandrapur city@ news • कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आ....

Chandrapur city@ news • कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आ. जोरगेवार यांनी दिली भेट! • मागण्यांची पुर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. किशोर जोरगेवार • आंदोलनस्थळी ममता शेंडे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने वेधले अनेकांचे लक्ष !

217

Chandrapur city@ news

• कंत्राटी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आ. जोरगेवार यांनी दिली भेट!
• मागण्यांची पुर्तता करण्यासाठी प्रयत्न करणार – आ. किशोर जोरगेवार
• आंदोलनस्थळी ममता शेंडे यांनी रेखाटलेल्या रांगोळीने वेधले अनेकांचे लक्ष !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:गेल्या तीन आठवड्यापासून विविध मागण्यांना घेऊन एन. आर. एच. एम. च्या कर्मचा-यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समीतीच्या वतीने चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर आपले आंदोलन सुरु केले आहे. आज या आंदोलनस्थळी चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्या रास्त असून त्या सोडविण्यासाठी आपण पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.

यावेळी एन.आर. एच. एम. च्या महिला कर्मचा-यांनी भाऊबीज करत आ. जोरगेवार यांचे औक्षवंत केले. कर्मचा-यांच्या मागण्यांसदर्भात राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिव यांची भेट घेऊन आपल्या मागण्या मार्गी लागाव्यात यासाठी एक बैठक आयोजित करण्याच्या दिशेने प्रयत्न करेल असे यावेळी ते म्हणाले. यावेळी संघटनेचे पदाधिकारी रविंद्र उमाठे, डाॅ. तिरथ उराडे, अतुल शेंद्रे, डाॅ. अक्षय बुर्लावार, डाॅ. दीपक भट्टाचार्य, वनिता मेश्राम, डाॅ. विनोद फुलझेले, ललिता मुत्तेलवार, डाॅ. तुषार आगडे, जया मेंदळकर, अश्विनी येंबरवार, प्रफुल रासपल्ले, रुपेश हिरमठ, मित्रंजय निरंजने , डॉ.पुजा महेशकर,यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे युवा नेते अमोल शेंडे, प्रतिक शिवणकर, राशेद हुसेन, नकुल वासमवार, कार्तिक बुरेवार आदिंची उपस्थिती होती.
राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत शहरी, ग्रामीण व एन. यु. एच. एम .अंतर्गत कार्यरत तसेच एन .एच .एम. कंत्राटी कर्मचा-यांना वयाची अट शिथिल करुन नियमित रिक्त पदावर समायोजन करण्यासाठी धोरनात्मक निर्णय घेण्यात यावा, विशेष भरती मोहिम दर सहा महिण्यांनी राबविण्यात यावी, एनएचएम अंतर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना एच. आर .पाॅलिसी त्वरित लागु करण्यात यावी, एम .एच. एम .अतंर्गत कार्यरत सर्व अधिकारी व कर्मचारी यांना ईपीएफ योजनेचा त्वरित लाभ देण्यात यावा यासह ईतर मागण्यांना घेऊन एन.आर.एच.एम.अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन सुरु करण्यात आले आहे. चंद्रपूरातही जिल्हाधिकारी कार्यालया समोर त्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान आज आमदार जोरगेवार यांनी आंदोलनर्त्यांची भेट घेतली. ऐन दिवाळीत तुमचे आंदोलन सुरु आहे. तुम्ही दिवाळी साजरी केली नाही. असे यावेळी आमदार जोरगेवार बोलून गेले.

आपल्या मागण्या रास्त आहे. सरकारकडेही याचा सातत्याने पाठपुरावा सुरु आहे. यावर तोडगा निघावा यासाठी मी सुध्दा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. शिक्षण आणि आरोग्य सेवा बळकट झाली पाहिजे. हे करत असतांना ही सेवा देणा-या अधिकारी आणि कर्मचा-यांच्याही समस्या सुटाव्यात ही भावना आपली आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना सुरक्षा आणि सन्मान मिळावा ही आमची जबाबदारी आहे.

अधिवेशनात आपला विषय नक्कीच मांडणार आहे. पण त्यापुर्विही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी आपली भेट घडवून आणण्यासाठीही माझे प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.आ.जोरगेवार यांच्या भेटी दरम्यान आंदोलनकर्ते अधिकारी आणि कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

आज आंदोलनस्थळी मूल उपजिल्हा रुग्णालयातील (एन.सी.डी) ममता शेंडे यांनी आकर्षक व मनोवेधक रांगोळी रेखाटली होती.या सुरेख रांगोळीने शहरातील नागरिकांचे अक्षरशः लक्ष वेधले होते.