Home Breaking News Chandrapur city@ news • गोल्ला गोलकर (यादव)समाज संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यगणांनी मानले...

Chandrapur city@ news • गोल्ला गोलकर (यादव)समाज संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यगणांनी मानले पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे आभार

187

Chandrapur city@ news
• गोल्ला गोलकर (यादव)समाज संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यगणांनी मानले पालकमंत्री
सुधीर मुनगंटीवारांचे आभार !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:राज्याचे वने सांस्कृतिक कार्य मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अथक प्रयत्नातून चंद्रपूर येथील गोलकर समाजाचे सामाजिक सभागृह बांधकामाकरिता 50 लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवून दिल्याच्या निमित्ताने चंद्रपूर गोल्ला, गोलकर (यादव) समाज बांधवांनी त्यांचे आज दि. 16 नोव्हेंबरला पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आभार पत्र देऊन आभार मानले .
याप्रसंगी गोलकर समाजाचे जिल्हाध्यक्ष अजय मेकलवार, उपाध्यक्ष किरण चेनमेनवार सचिव महेश मॅकलवार, सहसचिव श्यामराज भंडारी, शंकर मद्देलवार जेष्ठ समाज कार्यकर्ते मनोहर कोपुलवार, संघटक प्रवीण भिमनवार , पुरुषोत्तम कोमलवार, विजय दंडिकवार, ‌पंकज बुर्रीवार, सचिन येरमलवार, विवेक गुडलवार, संजय मेकलवार, या शिवाय माजी जि.प. सदस्या शिलाताई मेकलवार,राधा चेनमेनवार, अपर्णा मेकलवार, राधा भंडारी,रजनी गुडलवार यांच्यासह मोठया संख्येने समाज बांधव व भगीनी उपस्थित होते.
मी तुमच्या पाठीशी सदैव असल्याचे ना.मुनगंटीवार या वेळी म्हणाले. जेव्हा जेव्हा काही मदत पडल्यास ती मदत करायला मी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. सजाजाच्या सर्व मागण्या मी शासन दरबारी पोहचविण्याचे तसेच समाजाचे प्रश्न निकाली काढण्याचे सर्व शक्तीनिशी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी उपस्थितीतांना दिले.