Home Breaking News Varora city @news • वरोरा शहरात रोटरी उत्सवाचे आयोजन • विविध...

Varora city @news • वरोरा शहरात रोटरी उत्सवाचे आयोजन • विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची राहणार रेलचेल

112

Varora city @news
• वरोरा शहरात रोटरी उत्सवाचे आयोजन

• विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची राहणार रेलचेल

✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : 22 नोव्हेंबर रोटरी क्लब च्या वतीने दरवर्षी रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी सुद्धा 24 ते 29 नोव्हेंबर दरम्यान क्रीडा संकुलाच्या मैदानावर भव्य रोटरी उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे
या उत्सवाचे 24 तारखेला उद्घाटन होणार असून याप्रसंगी कन्यका नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष व गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर विजय आईंचवर तसेच रोटरीचे उपप्रांतपाल नितेश जयस्वाल, एक्सलंट अकॅडमी चे संचालक प्रा अभय टोंगे आणि आनंदवन येथील मूक बधिर विद्यार्थ्यांच्या हस्ते होणार आहे

रोटरी उत्सवाचे हे आठवे वर्ष असून एक लाख पन्नास हजार वर्ग फुटामध्ये हा भव्य उत्सव आयोजित केलेला आहे. यामध्ये विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल, विविध कंपन्यांचे नवनवीन उत्पादने यांची विशाल प्रदर्शनी, परिवाराला आकर्षित करणारे मनोरंजन पार्क, गायन, नृत्य, रील आदी स्पर्धा हे या उत्सवाचे वैशिष्ट्य राहणार आहे. दरवर्षी सुमारे एक लाख भेट देतात पंजाबी आणि गुजराती खाद्यपदार्थांच्या स्टॉलसह एकूण या उत्सवामध्ये राहणार आहेत. महिला सशक्तिकरनाला प्राधान्य देत काही स्टॉल महिलांकरता मोफत देण्याचे आयोजकांनी ठरविले आहे. तसेच वरोरा शहरातील पहिली ते सहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पास वितरण करण्यात येणार आहे.

या प्रसंगी शहरातील विविध सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा संघटनांचा सत्कार करणार करण्यात येणार असून सामूहिक तुळशी विवाह सोहळा या उत्सवाचे प्रमुख आकर्षण राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत उपस्थित रोटरीचे अध्यक्ष डॉ. सागर वझे, सचिव ऍड मधुकर फुलझेले तसेच रोटरीचे पदाधिकारी हुजैफा अली, नितेश जयस्वाल, समीर बारई, योगेश डोंगरवार पराग पत्तीवार , हिरालाल बघेले, बंडू देऊळकर, मनोज कोहळे, सचिन जिवतोडे, आदी पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अधिकाधिक संख्येने या उत्सवाला भेट देण्याचे आवाहन रोटरीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे