Home Breaking News Chandrapur city@ news • राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम संपन्न! • चंद्रपूर जिल्ह्याच्या...

Chandrapur city@ news • राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम संपन्न! • चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रियंका गायकवाड यांनी केले “त्या” विद्यार्थ्यांचे नेतृत्व!

72

Chandrapur city@ news
• राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम संपन्न!
• चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रियंका गायकवाड यांनी केले “त्या” विद्यार्थ्यांचे नेतृत्व!

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:नेहरु युवा केंद्र व युनिसेफ यांच्या वतीने राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रम दि. 19 नोव्हेंबर व 20 नोव्हेंबर रोजी कलिना कॅम्पस मुंबई विद्यापीठात पार पडला.

19 नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यातून निवडून आलेले 24 मंत्री तसेच विरुद्ध पक्षनेते 52 पूर्ण संसद व अध्यक्षाच्या उपस्थित विरुद्ध पक्षनेत्यांनी मंत्र्यांना प्रश्न विचारत ही सभा भरली होती.हा दिवस संपूर्ण राजकारणावर गाजला. राजकारणाचे कामकाज कसे राहते, कसे चालते, व कोणते मंत्री कोणत्या बाजूला बसतात याची इंतभू माहिती दौरा कार्यक्रम निमित्ताने गेलेल्या विद्यार्थ्यांना दि.19नोव्हेंबरला झाली.
20 नोव्हेंबरला राज्यपाल सचिव भवनाला भेट !राज्यपाल महोदय रमेश बैस यांनी मुलांना या वेळी मोलाचे मार्गदर्शन केले.या कार्यक्रम निमित्ताने उपस्थित विद्यार्थ्यांनी राजकारणाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेतली.दरम्यान या वेळी राजभवन व त्या परिसराची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.
दुपारच्या सत्रात विधान भवन सभागृहाला भेट देत माहिती समजून घेतली .नंतर विधान परिषद सभागृहाला त्यांनी भेट दिली .या वेळी विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे ह्या उपस्थित होत्या .त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे प्रश्न समजावून घेत त्यावर उत्तर दिले .याच वेळी त्यांनी स्वतःचा संक्षिप्त जीवन प्रवास विद्यार्थ्यांना सांगितला.
संध्याकाळी विद्यार्थ्यांनी गेट वे ऑफ इंडिया येथे भेट दिली.
दोन दिवशीय कार्यक्रमामध्ये खूप अनुभवी गोष्टी शिकायला मिळाल्या,समाजाबद्दल आपल्याला जागरूक कसे होता येणार आणि समाजाला समोर कसे नेता येणार या सगळ्या गोष्टी या दोन दिवशीय कार्यक्रमामध्ये शिकायला मिळाल्या व तेवढेच अनुभव आलेअशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रियंका गायकवाड यांनी आज स्वगावी परतल्यानंतर व्यक्त केली.
नेहरु युवा केंद्र आणि युनीसेफने आमचे व्यक्तीमत्व अधिक भक्कम वैचारिक होण्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास मदत केली अश्या ही या वेळी बोलताना प्रियंका गायकवाड म्हणाल्या.त्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक नवोदित सदस्य आहेत.

दोन दिवशीय कार्यक्रमात युवा संसद लोकसभेच्या क्रीडा मंत्रीपदाची प्रियंका गायकवाड यांनी महत्वाची भूमिका बजावली. यात त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे नेतृत्व ही केले.
नेहरु युवा केंद्र संघटन महाराष्ट्र – गोवा राज्य निर्देशक प्रकाश मनुरे तसेच तानाजी पाटील यांचे प्रियंका गायकवाड यांना मार्गदर्शन लाभले.राज्यातील अभिरूप युवा संसद ही राजधानी मुंबई येथील विद्यापीठ कॅम्पस ,कलीना कॅम्पस सांता कलुज येथे संपन्न झाली.