Home Breaking News Chandrapur dist@ news • घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या...

Chandrapur dist@ news • घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 28 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन • घरकुल योजना-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे शासनाला दिले निवेदन

302

Chandrapur dist@ news
• घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास येत्या 28 नोव्हेंबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन

• घरकुल योजना-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांचे शासनाला दिले निवेदन

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:ग्रामीण गृहनिर्माण योजना शासनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना असून रात्रंदिवस राबून वेळेत काम करणाऱ्या राज्य स्तरीय, विभाग स्तरीय, जिल्हा स्तरीय प्रोग्रामर व तालुका स्तरीय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. घरकुल योजना-ग्रामीण च्या प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी मुळ मानधनामध्ये वाढ करणे व मागण्या पुर्ण करणेबाबत प्रधान सचिव ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन दिले आहे. त्याअनुषंगाने प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हिंगोली यांना सुध्दा जिल्हास्तरीय प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दि. 20 नोव्हेंबरला दिले आहे.

केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे संपुर्ण काम राज्य स्तर, विभाग स्तर, जिल्हा स्तर प्रोग्रामर व तालुका स्तर ऑपरेटर गेल्या कित्येक दिवसांपासून करत आहेत. सर्व कर्मचारी यांचा अनुभव व वय बघता जॉब सुरक्षा बाबत विचार व्हावा व वयाच्या 58 वर्ष पर्यंत नोकरीची हमी मिळावी, ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन व इतर सर्व विभामध्ये ज्याप्रमाणे HR Policy लागू केलेल्या आहे त्या सर्व आम्हाला तात्काळ लागू करून मिळाव्यात, मुळ मानधामध्ये एकुण 30 टक्के मानधन वाढ करावी, महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन मिळावे, CSC e-Governance संस्थेमार्फत प्राप्त होणारे मासिक मानधन तपशील पाहता एकुण मुळ मानधनातून Gratuity, ESIC, PT, यांची मासिक रक्कम कपात केली जाते यांच्या मासिक मुळ माधनातून PF, Gratuity, ESIC कपात न करता ती नियमानुसार संबंधित संस्थेने अदा करावी, शसकीय भरतीमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात अशा मागण्या त्यांनी निवेदनाद्वारे केल्या असून सदरहु मागण्याबाबत सकारात्मक प्रतीसाद न मिळाल्यास दि. 28 नोव्हेंबर 2023 पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागेल व महाराष्ट्र राज्यात घरकुल योजना- ग्रामीणचे कामकाज बंद करावे लागेल असा इशारा दिला आहे.
प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपूर यांना निवेदन देतांना जिल्हा प्रोग्रामर दिपाली जवळे, जिल्हा ऑपरेटर मीनाक्षी क्षीरसागर, तालुका ऑपरेटर प्रकाश घडसे, स्वप्नील भगत, सचिन बुरांडे आदिं उपस्थित होते.