Home Breaking News Ghugus city@ news •लाइट्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे नेत्र ,शिबिर,आरोग्य,मानवी प्रतिकारहीनता विषाणू तपासणी...

Ghugus city@ news •लाइट्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे नेत्र ,शिबिर,आरोग्य,मानवी प्रतिकारहीनता विषाणू तपासणी शिबीर संपन्न

51

Ghugus city@ news
•लाइट्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे नेत्र ,शिबिर,आरोग्य,मानवी प्रतिकारहीनता विषाणू तपासणी शिबीर संपन्न

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घुस:दि.२४ नोव्हेंबर २०२३ शुक्रवार रोजी लाॅयड्स मेटल्स अँड उद्योगात परिसरात लाॅईड्स इन्फिनिट फाउंडेशन तर्फे नेत्र,आरोग्य,बीपी,शुगर व मानवी प्रतिकारहीनता विषाणू (HIV)शिबीर आयोजित करण्यात आले.
तसेच सी.एस.आर व्यवस्थापक नम्रपाली गोंडाणे यांनी ड्राइवर, कर्मचारी व परिसरातील नागरिकला आपल्या मनोगतातून सांगितले की,कंपनीच्या परिसरात पहिल्यांदाच कार्यक्रम आयोजित केला आहे,ट्रक डायव्हरसाठी आणि सहा.पोलीस निरीक्षक आलेले आहे,कमितकमी दोनशे च्या वर ट्रक डायव्हर चेकअप करणार असे आशा व्यक्त करण्यात आले.

सहा.पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की,सर्व कर्मचारी आलेले आहेत, त्यांनी हेल्थ चेकअप करुन घ्यावा,आणि कुठला आजार आहे, जे डायव्हर आहे त्यांनी डोळे चेकअप करुन घ्या, सद्या अपघाताच प्रमाण खूप वाढत आहे,आणि त्यामध्ये विनाकारण एकाचा जीवहानी, जीव जातो,याकरिता प्रत्येकांनी हेल्थ चेकअप केली पाहीजे, आपले डोळे चांगले राहीले तर समोरचा अपघात टाळला जातो,ईथे जे चालत असतील त्यांनी (दारु) व्यसन करुन नका चालवा, एकाद्याचा बळी जातो,त्यामधे आणि कधीतरी आपल्या घरचा सुद्धा सदस्य राहू शकतो.याची काळजी घ्यायची आहे,प्रत्येकाने या हेल्थ क्लब चेकअप प्रत्येकांनी आशावाद घ्याचा आणि स्वताच चेकअप करुन घ्याच व आरोग्य द्यावी राहायच सर्व कर्मचारांना तसेच ट्रक डायव्हरना शुभेच्छा देण्यात आले.

यावेळी शेकडो कर्मचारी व ट्रक डायव्हरांनी हेल्थ चेकअप कॅम्पच्या लाभ घेण्यात आले.

याप्रसंगी सी.एस.आर व्यवस्थापक नम्रपाली गोंडाने,सह.पो.नि.प्रशांत साखरे,भा.लाॅ.मे.का.सं.घुग्घुस महामंत्री हिवराज बागडे,एका विभागाचे प्रमुख हेड श्री.पियुस गोयल,गोव्हरमेंट (HIV) अधिकारी निरंजन मंनगूळ,रोटरी क्लबचे अध्यक्ष अनुप यादव,सेक्रटरी कुंजीभाई प्रन्नार, सदस्य अजय पापलवार,सहाय्यक सीएसआर अधिकारी रतन मेडा,श्रीकांत हस्ते,सुरेंद्र वासेकर, वैभव बोरडे, श्रीकांत बहादूर, ईरसाद शेख,प्रवीण सींग, मनोज बाविस्कर, राजीव सिंग, विवेक पटानीया, तुषार पानपट्टी, कूप्रेश बडकेलवार, प्रितम आगदारी तसेच स्टाफ,डायव्हर कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.