Home Breaking News Ghugus city@ news • रक्तदात्यांचे शहर म्हणून घुग्घुस शहराची नवी ओळख ...

Ghugus city@ news • रक्तदात्यांचे शहर म्हणून घुग्घुस शहराची नवी ओळख • तब्बल १४०९ दात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले विक्रमी रक्तदान • १९ वर्षापासून घुग्घुसमध्ये उपक्रम

109

Ghugus city@ news
• रक्तदात्यांचे शहर म्हणून घुग्घुस शहराची नवी ओळख

• तब्बल १४०९ दात्यांनी स्वयंस्फूर्तीने केले विक्रमी रक्तदान

• १९ वर्षापासून घुग्घुसमध्ये उपक्रम

✍️पंकज रामटेके
सुवर्ण भारत:उपजिल्हा प्रतिनिधी, चंद्रपुर

घुग्घुस:चंद्रपूरचे माजी जि.प. अध्यक्ष तथा राजुरा विधानसभा प्रमुख देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घुग्घुस येथील गांधी चौक येथे “रक्तदान करूया, प्रेमाचे नाते जोडूया” हे ब्रीद वाक्य घेऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

भव्य रक्तदान शिबिराचे उदघाटन वेकोलि वणी क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक आभास सिंग यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणुन ठाणेदार आसिफराजा शेख, मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, माजी जि.प.सभापती ब्रिजभूषण पाझारे, नितु चौधरी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी सरपंच संतोष नुने, विनोद चौधरी,चिन्नाजी नलभोगा, प्रेमलाल पारधी, संजय भोंगळे, राजेश मोरपाका, बबलू सातपुते, प्रयास सखी मंच मार्गदर्शिका अर्चना भोंगळे,अध्यक्ष किरण बोढे, सुचिता लुटे, वैशाली ढवस उपस्थित होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले.

देवराव भोंगळे मित्र परिवारातर्फे केक कापून माजी जि. प.अध्यक्ष तथा विधानसभा निवडणुक प्रमुख राजुरा देवराव भोंगळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तसेच सर्व धर्मीय, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, गुरुदेव सेवा मंडळ, ऑटो संघटना, डग्गा असोसिएशनचे चालक मालक यांनी माजी जि. प. अध्यक्ष देवराव भोंगळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
घुग्घुस शहरात सकाळपासून रक्तदान करण्यासाठी युवकांचा रांगा लागल्या होत्या तब्बल १४०९ रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून महाराष्ट्रात विक्रम केला. त्यामुळे रक्तदात्यांचे शहर म्हणून घुग्घुस शहराची ओळख निर्माण झाली आहे.

सरकारी रक्तपेढी चंद्रपूर व डॉ. हेडगेवार रक्तपेठी नागपूर यांना रक्त संकलन करण्यासाठी बोलाविण्यात आले होते.

देवरावदादा भोंगळे मित्र परिवार घुग्घुसतर्फे मागील १९ वर्षांपासून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे.