Home Breaking News Chandrapur dist@ news • गावातील महिलांनीच पुढाकार घेत पकडली अवैध दारू! •अवैध...

Chandrapur dist@ news • गावातील महिलांनीच पुढाकार घेत पकडली अवैध दारू! •अवैध दारु विक्रेत्यां विरुध्द महिलांनी कसली कंबर •गोजोली गावातील अवैध दारू कायमची बंद करा -ग्रामस्थांची एकमुखी मागणी

58

Chandrapur dist@ news
• गावातील महिलांनीच पुढाकार घेत पकडली अवैध दारू!
•अवैध दारु विक्रेत्यां विरुध्द महिलांनी कसली कंबर
•गोजोली गावातील अवैध दारू कायमची बंद करा -ग्रामस्थांची एकमुखी मागणी

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर: जिल्ह्याच्या गोंडपिपरी तालुक्यातील धाबा उप पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोजोली गावात मागील अनेक वर्षांपासून दिवसा ढवळ्या खुलेआम अवैध दारू विक्री सुरू
असल्यामुळे गावातील महिला वर्गात संताप व्यक्त केला जात आहे.या आधी अवैध दारू विक्रेत्यांवर पोलिस पथकाची थातुर मातुर कारवाई बघता गावात अनेक दारू विक्रेते निर्माण झाले आहे.एव्हढेच नाही तर गावात त्यांची मुजोरी अधिक वाढली आहे.यामुळे वैतागलेल्या गोजोली गावातील महिलांनी आता अवैध दारू विक्री विरोधात कंबर कसली असून अश्या अवैध दारू विक्रेत्यांना रंगेहाथ पकडून देण्याचा सपाटा सुरू केला असल्याचे एकंदरीत दिसून येते. पोलिसांची भूमिका ही संशयास्पद असल्याचे आता खुल्लमखुल्ला गावकरी मंडळीत बोलल्या जाते.
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली हे छोटेसे गाव. गावात अवैध दारू विक्री सुरू आहे. या विरोधात महिलांनी अनेकदा आपला या बाबतीत बुलंद आवाज उठविला. मात्र यांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.त्यामुळे दारु विक्रेत्यांची हिंमत वाढली व ते गावातच खुलेआम अवैध दारू विक्री करु लागले.
मागील दोन तीन महिन्याच्या आधी गावातीलच महिलांनी अवैध दारू विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या घरातून दारू पकडली होती. मात्र दारू विक्रेत्यानेच उलट आरोप करून महिलांवरच गुन्हे दाखल केले. होते .असा विचित्र प्रकार घडला होता असे कळते.घटना घडून देखील पोलिस प्रशासन मात्र या अवैध दारू विक्रीवर नियंत्रण ठेवू शकले नाही. दारू विक्री सुरूच होती.दि.21 नोव्हेंबरला पुन्हा गावातील महिलांनी पाळत ठेऊन एकदा अवैध दारू पकडली अन् थेट पोलिस स्टेशनला फोन केला. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दोन संशयीत आरोपींवर गून्हे दाखल केले. पण सदासर्वदा महिलांनी याबाबत पुढाकार घ्यावा व स्वतःवर गुन्हे दाखल करुन घ्यावे का? असा देखिल प्रश्न या निमित्ताने महिलांनी उपस्थित केला आहे.दरम्यान गावातील अवैध दारू विक्री कायमची बंद करावी अशी मागणी आता गावातील महिलांनी केली आहे.