Home Breaking News Chandrapur dist@ news • चंद्रपूरात उद्या पासून रंगणार महसूल विभागाचे क्रिकेट सामने...

Chandrapur dist@ news • चंद्रपूरात उद्या पासून रंगणार महसूल विभागाचे क्रिकेट सामने !

150

Chandrapur dist@ news
• चंद्रपूरात उद्या पासून रंगणार महसूल विभागाचे क्रिकेट सामने !

✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर: जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या निमित्ताने उद्या दि.25
नोव्हेंबरला (शनिवारला) चंद्रपूर शहरातील सेंट मायकेल इंग्लिश स्कूलच्या सुसज्ज मैदानावर रंगणार असून आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत जिल्ह्यातील तब्बल 800
खेळाडू सहभागी होत असल्याचे समजते.दरम्यान गत वर्षी झालेल्या एका क्रिकेट सामन्यात वरोरा महसूल विभागाचा अष्टपैलू खेळाडू अमोल आखाडे यांनी चौफेर फटकेबाजी करीत मैदानावर उपस्थित क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधले होते.बहुतांशी सामने हे अतितटीचे व चुरशीचे झाले होते.पण गत वर्षी झालेल्या याच क्रिकेट सामन्यात भरोश्याचे फलंदाज चंद्रपूर तहसिल कार्यालयाचे माजी तहसिलदार निलेश गोंड भोपळा न फोडता तंबूत परतले होते.दि.27नोव्हेंबर 2023 ला क्रिकेटचा अंतिम सामना होत असून नियमित क्रीडा स्पर्धा ह्या विसापूर बल्हारपूर तालूका क्रीडा संकुल येथे होत असून त्याचे रितसर उद्घाटन दि.1डिसेंबर रोजी होत आहे.स्पर्धेचा समारोप दि.3 डिसेंबर रोजी होत आहे.