Home Breaking News Varora city @news • समस्या नियंत्रनात आनण्यात पालिका प्रशासक राज कमालीचे अपयशी...

Varora city @news • समस्या नियंत्रनात आनण्यात पालिका प्रशासक राज कमालीचे अपयशी • मुख्य धान्य बाजारातील कचरा आणि दुर्गंधीमुळे व्यापारी, ग्राहक आणि ये-जा करणारे त्रस्त

44

Varora city @news
• समस्या नियंत्रनात आनण्यात पालिका प्रशासक राज कमालीचे अपयशी

• मुख्य धान्य बाजारातील कचरा आणि दुर्गंधीमुळे व्यापारी, ग्राहक आणि ये-जा करणारे त्रस्त

✍️खेमचंद नेरकर
सुवर्ण भारत:तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा : 17 मे 1867 रोजी स्थापन झालेल्या नगरपालिकेने स्वच्छता सर्वेक्षण मोहिमेत महाराष्ट्र स्तरावर बाजी मारली होती.डिसेंबर 2021 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने या नगरपालिकेवर जवळपास दोन वर्षे पासून प्रशासकीय राजवट आहे.
या नगरपालिकेच्या हद्दीत अनेक समस्या प्रलंबित आहेत.या सर्व समस्या दिवसेंदिवस चौपट वेगाने वाढत आहेत.या समस्यांबाबतच्या तक्रारी व बातम्या अनेकवेळा प्रसिद्ध झाल्या आहेत, मात्र याचा कोणताही परिणाम नगरपालिकेवर झाल्याचे दिसत नाही धान्य मार्केट शहराच्या मध्यभागी वसलेले आहे.येथे बंद पडलेल्या शौचालयामुळे लोकं शंभूनाथ वरघणे किराणा दुकानाशेजारील नालीत लघवी करतात.त्या नालीत पाण्याचा प्रवाह नसल्यामुळे तसेच येथील लोकं नालीत व दुकाना शेजारी कचरा टाकत असल्याने भयंकर दुर्गंधी पसरली असल्याने स्थानिक व्यापारी, लोकं भयंकर त्रस्त आहेत. या नगर पालिकेतील नियोजन शून्यता मुळे शहराला अनेक समस्यांनी घेरले आहे शहरात वाढती अतिक्रमणे, शहरातील विद्युत खांबा वरील बंद पडलेले लाईट, वणी रोडवरील कचरा डेपोची दुरावस्था, प्रत्येक प्रभागात कचऱ्याचे ढीग , प्रदूषित पाणी आणि बांधकामातील भ्रष्टाचार. उखडलेले रस्ते नगरपालिकेच्या अपयशाची साक्ष देत आहेत.सर्व समस्ये मुळे शहरवासीयांची होणारी गैरसोय पाहता वरोरा नगर पालिका येथे 2019 मध्ये सेवा देणारे किर्ती किरण एच पुजार (भा प्र से ) सारखा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची त्वरित मागणी जनतेतून होत आहे.

नगर पालिकेच्या दर्शनीय भिंतीवर सरकारी कर्मचाऱ्यांनशी गैरवर्तन केल्यास कोण कोणत्या कायद्या अंतर्गत कारवाई होऊ शकते याचा तक्ता बॅनर लावलेले आहे परंतु सरकारी कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात हयगय करून लोकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या सरकारी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कोणत्या कायद्या अंतर्गत कारवाई होवू शकते याची सूची मात्र जनतेच्या जागृती करिता लावलेली दिसत नाही.कारवाई च्या भीती पोटी सामाजिक कार्यकर्ते किंवा जनता समस्या विषयी प्रखरतेनी भूमिका मांडू शकत नसल्याने समस्या वाढत आहे समस्येवर तोडगा काढण्यात प्रशासक असमर्थ दिसत असल्याने वरोरा नगर पालिके मध्ये सक्षम प्रशासकाची मागणी जनतेतून होत आहे.