Chandrapur city@ news
•चंद्रपूरात महसूल विभागाचे क्रिकेट सामने प्रारंभ !
•वरोरा उपविभाग क्रिकेट टीमने केला मूल महसूल विभाग क्रिकेट संघाचा दणदणीत पराभव
✍️ किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक
चंद्रपूर: जिल्हास्तरीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या निमित्ताने दि.25
नोव्हेंबरपासून चंद्रपूर शहरातील सेंट मायकेल इंग्लिश स्कूलच्या सुसज्ज मैदानावर महसूल विभागाचे उपविभागीय स्तरीय क्रिकेट सामने प्रारंभ झाले असून काल पार पडलेल्या अतितटीच्या व चुरशीच्या सामन्यात चंद्रपूर जिल्हाधिकारी क्रिकेट संघाने ब्रम्हपूरी महसूल उपविभागाचा दणदणीत पराभव केला.याच मैदानावर झालेल्या एका दुसऱ्या सामान्यात चिमूर महसूल उपविभाग क्रिकेट टीमने गोंडपिपरी उपविभागीय क्रिकेट संघाला पराभूत केले तर चंद्रपूर बल्लारपूर उपविभागीय क्रिकेट संघाने राजूरा उपविभाग महसूल संघाला( क्रिकेट सामन्यात) धुळ चारली. आज रविवारी सकाळी झालेल्या एका अतिशय रंगतदार क्रिकेट सामन्यात वरोरा महसूल उपविभागाने मूल उपविभागीय संघाला पराभूत केले. वरोरा संघाचा कर्णधार अमोल आखाडे यांनी अतिशय उत्तम फलंदाजी करत ना बाद 40 धावा कुठल्या तर मूल संघाचा कर्णधार अमोल करपे यांना आजच्या सामन्यात कुठलाच सुर गवसला नाही.त्यांच्या संघाचे सर्वच गडी पटापट तंबूत परततांना (सुसज्ज मैदानावर) दिसून आले.
करपे यांच्या संघाचे क्षेत्ररक्षण हे अतिशय गचाळ स्वरूपाचे होते व गोलंदाजी म्हणावी तशी खास नव्हती.त्यामुळे मूल उपविभाग किक्रेट संघाचा पराभव झाला.
दरम्यान चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी मैदानावर आज दोन्ही टीमच्या खेळाडूंचा परिचय करून घेतला व त्यांना शुभेच्छा दिल्या. मूल -वरोरा संघाचा क्रिकेट सामना बघण्यासाठी मूल टीमचे एक खेळाडू दिपक गोहने यांच्या मातोश्री व अर्धांगिनी मैदानावर उपस्थित झाल्या होत्या .परंतू दिपक गोहने हे भोपळा न फोडता तंबूत परतले.
येत्या 27 नोव्हेंबर 2023 ला क्रिकेटचा अंतिम सामना होत असून नियमित क्रीडा स्पर्धा ह्या विसापूर बल्हारपूर तालूका क्रीडा संकुल येथे होत असून त्याचे रितसर उद्घाटन दि.1डिसेंबर रोजी होत आहे.स्पर्धेचा समारोप दि.3 डिसेंबर रोजी होणार आहे.विविध स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 800 खेळाडू सहभागी होत असल्याचे समजते.
