Home Breaking News • बाल कलावंतांनी जिंकली श्रोत्यांची मने •मुंबईत पार पडला “हल्लागुल्ला” कार्यक्रम! •दुरदशर्नच्या...

• बाल कलावंतांनी जिंकली श्रोत्यांची मने •मुंबईत पार पडला “हल्लागुल्ला” कार्यक्रम! •दुरदशर्नच्या जेष्ठ न्यूज रीडर विणा मिश्रांची होती कार्यक्रमाला उपस्थिती !

267

• बाल कलावंतांनी जिंकली श्रोत्यांची मने
•मुंबईत पार पडला “हल्लागुल्ला” कार्यक्रम!
•दुरदशर्नच्या जेष्ठ न्यूज रीडर विणा मिश्रांची होती कार्यक्रमाला उपस्थिती !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

मुंबई:”संधी मिळाल्यास लहान मुलेही प्रस्थापितांची जागा घेऊ शकतात असे वक्तव्य महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृपच्या मार्गदर्शिका प्रा. सुनंदा पाटील यांनी केले. ती संधी स्वरांजली एन्टरटेनमेंटच्या स्मृती वेंगुर्लेकर यांनी अनेकांना दिली आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
बालकदिनाचे औचित्य साधून ” स्वरांजली तर्फे ” गायन , वादन, नृत्य या आविष्कारांनी इस्क्वेअर , सुभाष रोड विलेपार्ले येथील सभागृह रंगून गेले . ” हल्लागुल्ला ” हे साजेसे नाव देऊन हा कार्यक्रम नुकताच सादर करण्यात आला.
यावेळी ◆दूरदर्शनच्या जेष्ठ न्यूजरीडर वीणा मिश्रा आणि व्यास संगीत विद्यालयाच्या व्यास◆ ह्या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या .सुरुवातीला स्मृती वेंगुर्लेकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले , आणि संस्थेची माहिती दिली. या संस्थेने आजवर १५० हून अधिक कार्यक्रम दिलेले आहेत.

कार्यक्रमाची सुरुवात अनन्या या मुलीने ” एकदंताय वक्रतुंडाय ” या गीताने केली. स्पृहा पाटील या लहानगीने ” श्रीरामचंद्र कृपालू भजमन ” हे संत तुलसीदासकृत भजन ताकदीने पेश करून रसिकांची मने जिंकली . यानंतर स्वरा , मिरा, श्रिया ,श्रेया , वेदा , आर्यही, पूर्वी , तनिष्का , मानस, रिया, आभा . नाविन्या या कलावंतांनी विविध गाणी सादर केली.

स्पृहा , तनिष्का , मानस, रिया यांनी भूप , बिहाग, बागेश्री , आसावरी या विविध रागामधील सरगम , बंदिशी , तराणा असा भरगच्च नजराणा श्रोत्यांसमोर सादर केला . आभा परब या मुलीने विविध रागांतील सुरावटी सतारीवर वाजवून दाद घेतली .
स्पृहा पाटील या मराठी बालिकेने ब्रह्म वोकटे हे तेलगू गीत अतिशय बहारदार पणे सादर केले . स्पृहा ही प्रा. सुनंदा पाटील यांची नात आहे.

याच मंचावर तन्वी , सौम्या आणि समुहाने कथ्थक नृत्य सादर केले.

तनिष्का कुलकर्णीच्या “पूछो ना यार क्या हुआ ? ” या गीताने कार्यकमाची सांगता झाली.
कार्यक्रमाला शेवट पर्यंत श्रोत्यांची भरगच्च उपस्थिती लाभली होती .
संस्थेतर्फे सर्व सहभागी मुलांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला गेला . पालकांच्या वतीने जेष्ठ साहित्यिक प्रा. सुनंदा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि सर्वांचे आभार मानले . सदैव सर्व उपस्थितीतांच्या व रसिकांच्या स्मरणात रहावा असा एक कार्यक्रम पार पडला.