Home Breaking News Chandrapur dist@ news • येत्या 14 डिसेंबर पासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत...

Chandrapur dist@ news • येत्या 14 डिसेंबर पासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

233

Chandrapur dist@ news
• येत्या 14 डिसेंबर पासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपूर :येत्या 14 डिसेंबर 2023 पासून राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर जात असून तश्या आशयाचे एक लेखी निवेदन राज्य सरकारी कर्मचारी चंद्रपूर जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आज (बुधवारी) चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे यांना सादर केले आहे.प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसंदर्भात शासन आश्वासने देतात परंतु मागण्या मान्य करत नाही त्या अनुषंगाने सरकारी-निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, चंद्रपूर च्या वतीने जुनी पेन्शन सर्वांना मंजूर करा व इतर 17 मागण्यांबाबत शासनाला ठोस निर्णय घेण्यासाठी राज्यातील 17 लाख कर्मचारी-शिक्षकांनी दि. 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्धार पक्का केला आहे. नवीन पेन्शन योजनेमुळे गेली १७ वर्षे राज्यातील कर्मचारी-शिक्षक नाडले गेले आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे त्यांचे भविष्यच उध्वस्त झालेले आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना (OPS) सर्वांना लागू करा, शासनाच्या विविध विभागात कंत्राटी तत्वावर भरती करणे बंद करा, शैक्षणिक क्षेत्राचे खाजगीकरण करणे बंद करा, आरोग्य विभागातील अनेक रिक्त पदे तात्काळ भरा यासह अनेक मागण्यांच्या पूर्ततेसाठी माझे कुटुंब, माझी पेन्शन या शीर्षाखाली १८ मागण्यांच्या आग्रहासाठी राज्यातील १७ लाख कर्मचारी-शिक्षक बेमुदत संपावर जाण्यासाठी व सरकारप्रती क्षोभ व्यक्त करण्याच्या अनुषंगाने त्यांनी या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना
जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचे मार्फत प्रलंबित मागण्यां संदर्भात एक निवेदन सादर केले आहे

या वेळी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष दिपक जेऊरकर, कार्याध्यक्ष राजु धांडे, अतुल किनेकर, श्रीकांत येवले, अतुल साखरकर, नितीन पाटील, संदीप ठाकरे, अविनाश बोरगमवार,प्रितम शुक्ला, विष्णू नागरे, प्रकाश राऊत, शशिकांत आक्केवार, हेमंत बुरडकर आदिं उपस्थित होते.