Home Breaking News Chandrapur dist@ news •महाराष्ट्रातील घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रास्त मागण्यांसाठी बेमुदत काम बंद...

Chandrapur dist@ news •महाराष्ट्रातील घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रास्त मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन ! • आजचा दुसरा दिवस ! •आंदोलनाला मिळतोय चंद्रपूर जिल्ह्यातही उत्तम प्रतिसाद !

329

Chandrapur dist@ news
•महाराष्ट्रातील घरकुल-ग्रामीण कंत्राटी कर्मचाऱ्यांचे रास्त मागण्यांसाठी बेमुदत काम बंद आंदोलन !
• आजचा दुसरा दिवस !
•आंदोलनाला मिळतोय चंद्रपूर जिल्ह्यातही उत्तम प्रतिसाद !

✍️किरण घाटे
सुवर्ण भारत:सहसंपादक

चंद्रपुर:ग्रामीण गृहनिर्माण योजना ही शासनाची अत्यंत महत्वाची व लक्षवेधी योजना असून रात्रंदिवस राबून वेळेत काम करणाऱ्या राज्य स्तरीय, विभाग स्तरीय, जिल्हा स्तरीय प्रोग्रामर व तालुका स्तरीय ऑपरेटर तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. घरकुल योजना-ग्रामीण च्या प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी मुळ मानधनामध्ये वाढ करणे व मागण्या पूर्ण करणेबाबत प्रधान सचिव, ग्रामीण विकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना निवेदन दिले आहे . त्यांच्या मागण्यांची पूर्तता व्हावी यासाठी त्यांनी काल दि. 28 नोव्हेंबर पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे.

 

आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून चंद्रपूर जिल्ह्यातही या सुरू असलेल्या आंदोलनाला उत्तम प्रतिसाद मिळाला असल्याचे महाराष्ट्र राज्य घरकुल संगणक परिचालक संघटनेच्या एका पदाधिका-याने आज सांगितले.दरम्यान चंद्रपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रपुरचे प्रकल्प संचालक जिल्हा विकास यंत्रणा यांना देखील जिल्हास्तरीय प्रोग्रामर व ऑपरेटर यांनी त्यांच्या कामबंद आंदोलन बाबत काल निवेदन सादर केले आहे.
केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेचे संपूर्ण काम राज्य स्तर, विभाग स्तर, जिल्हा स्तर प्रोग्रामर व तालुका स्तर ऑपरेटर गेल्या कित्येक दिवसांपासून करीत आहेत. सर्व कर्मचारी यांचा अनुभव व वय बघता जॉब सुरक्षा बाबत विचार व्हावा व वयाच्या 58 वर्ष पर्यंत नोकरीची हमी मिळावी, ग्रामविकास विभागांतर्गत येणाऱ्या उमेद, मनरेगा, स्वच्छ भारत मिशन व इतर सर्व विभामध्ये ज्याप्रमाणे HR Policy लागू केलेल्या आहे त्या सर्व आम्हाला तात्काळ लागू करून मिळाव्यात, मुळ मानधामध्ये एकुण 30 टक्के मानधन वाढ करावी, महिन्याच्या 5 तारखेच्या आत मानधन मिळावे, CSC e-Governance संस्थेमार्फत प्राप्त होणारे मासिक मानधन तपशील पाहता एकुण मुळ मानधनातून Gratuity, ESIC, PT, यांची मासिक रक्कम कपात केली जाते .यांच्या मासिक मुळ माधनातून PF, Gratuity, ESIC कपात न करता ती नियमानुसार संबंधित संस्थेने अदा करावी, शसकीय भरतीमध्ये आरक्षित राखीव जागा उपलब्ध करून द्याव्यात आदिं मागण्यां त्यांनी निवेदनात नमूद केल्या असून सदरहु मागण्या पूर्ण व्हाव्या या साठी त्यांना आज पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा पवित्रा उचलावा लागला असे उपरोक्त संघटनेचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्यात घरकुल योजना- ग्रामीणचे कामकाज बंद करावे लागेल असा इशारा देखिल त्यांनी दिला होता.

जिल्हा प्रोग्रामरच्या दिपाली जवळे, जिल्हा ऑपरेटर मीनाक्षी क्षिरसागर, तालुका ऑपरेटर नितीन वेलपुलवार, पल्लवी पराते, दर्शना बुरडकर, अंगद गुंडले, महेश शेळके, प्रकाश घडसे, स्वप्निल भगत, प्रणित बोबाटे,प्रफुल करपे, गौरव सोरते, राजेंद्र खोब्रागडे, सचिन भसारकर, सचिन बुरांडे,पंकज झुरे, राजकुमार बावणे यांच्या सह अनेक कर्मचारी या बेमुदत कामबंद आंदोलनात उतरले आहेत.