Home Breaking News Gadchiroli dist@ news • माजी जि.प सदस्य भाग्यश्री आत्राम त्यांचा प्रयत्नांला यश...

Gadchiroli dist@ news • माजी जि.प सदस्य भाग्यश्री आत्राम त्यांचा प्रयत्नांला यश • वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीची मोजणी शासनाने दिली मंजुरी ; बंगाली समाज बांधवांना दिलासा

32

Gadchiroli dist@ news
• माजी जि.प सदस्य भाग्यश्री आत्राम त्यांचा प्रयत्नांला यश
• वनविभागाच्या अतिक्रमित जमिनीची मोजणी शासनाने दिली मंजुरी ; बंगाली समाज बांधवांना दिलासा

✍️शंकर महाकाली
सुवर्ण भारत:संपादक

मूलचेरा:- तालुक्यातील बंगालीबहुल भागातील बांधव मागील अनेक वर्षापासून वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून शेती करीत आपला उदरनिर्वाह करीत आले आहेत.या अतिक्रमित वनजमिनीचे मोजमाप करून सातबारा मिळावा यासाठी शासनाकडे मागणी लावून धरली. विशेष म्हणजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांनीही यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून तालुक्यातील अतिक्रमित धारकांना जमिनीची मोजणी करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे यामुळे संबंधित शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

मूलचेरा तालुक्यातील पाच गावात बहुसंख्य बंगाली समाजबांधव वास्तव्याने असून मागील अनेक वर्षापूर्वीपासून त्यांनी वनजमिनीवर अतिक्रमण करून शेती कसत आले आहेत.
मात्र शासनाकडून त्यांना हक्काच्या सातबारा मिळाला आहे संबंधित शेतकऱ्याद्वारे अतिक्रमित जमिनीचे मोजमाप करून हक्काच्या सातबारा मिळावा, यासाठी प्रशासन स्तरावर निवेदन,अर्ज सादर केले. मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष झाले. ही बाब अतिक्रमित शेतकऱ्यांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम यांचेसमोर मांडली. भाग्यश्री ताई आत्राम यांनीही संबंधितांना हक्काची जमीन मिळावी, यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.

या प्रयत्नाला यश आले असून शासनाने बंगाली बांधवांची मागणी मान्य करीत तालुक्यातील 5 गावातील 29 अतिक्रमण धारक शेतकऱ्यांची शेतजमिनीची मोजणी भूमि अभिलेख कार्यालयात मार्फत करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी लागणारा खर्च शासनाने मंजूर केला आहे. त्यामुळे तालुक्यातील संबंधित 5 गावातील 29 अतिक्रमकधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.