Home Breaking News Mul taluka@ news •कामगारांच्या हितासाठी पार पडला मूल नगरीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस...

Mul taluka@ news •कामगारांच्या हितासाठी पार पडला मूल नगरीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचा महामेळावा •हेमंत सोनारे,ॲड.संतोष शिंदे,विजय नळे ,दत्तात्रय समर्थ, कु.स्मिता पेरकेंची उपस्थिती ! •मेळाव्याला लावली शेकडों कामगार बांधवांनी हजेरी !

228

Mul taluka@ news
•कामगारांच्या हितासाठी पार पडला मूल नगरीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचा महामेळावा
•हेमंत सोनारे,ॲड.संतोष शिंदे,विजय नळे ,दत्तात्रय समर्थ, कु.स्मिता पेरकेंची उपस्थिती !
•मेळाव्याला लावली शेकडों कामगार बांधवांनी हजेरी !

सुवर्ण भारत
मूल:किरण घाटे(सहसंपादक)

विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मूल नगरीत काल शुक्रवार दि.१५ डिसेंबरला दुपारी १ वाजता स्थानिक डॉ.हेगडेवार सभागृहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलच्या वतीने कामगारांच्या हितासाठी एक मार्गदर्शक महामेळावा पार पडला.तालुक्यातील शेकडों कामगार बांधव या मेळाव्याला आवर्जून उपस्थित झाले होते.विशेष म्हणजे आयोजित या कार्यक्रमाला महिलांची व तरुणींची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.मेळाव्याचे अध्यक्षस्थान अधिवक्ता संतोष शिंदे यांनी भुषविले होते तर या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे अध्यक्ष हेमंत सोनारे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे सचिव विजय नळे,
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ,रोहित शिंगाडे,,संजय थूल ,भुषण मोरे,प्रितम सातपुते,करण कामटे, उपस्थित होते.याच भव्य मेळाव्याच्या निमित्ताने मान्यवरांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र बहाल करण्यात आले.सदरहु कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांग्रेसचे जेष्ठ नेते बंडु गुरनूले यांनी केले.त्यांनी आपल्या भाषणातून औद्योगिक सेलच्या कार्याची विस्तृतपणे माहिती दिली.या वेळी हेमंत सोनारे, अधिवक्ता संतोष शिंदे अधिवक्ता सातपुते,व अन्य मान्यवरांनी उपस्थितीतांना मोलाचे मार्गदर्शन केले.मेळाव्याला मूल शहरातील कामगार बांधवासह तालुक्यातील कामगार बांधवांची मोठ्या संख्येंने उपस्थिती लाभली होती.या शिवाय सदरहु कार्यक्रमाला नलिनी अडेप्पवार महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलं चंद्रपूरच्या तुकुम निवासी मंथना नन्नावरे,कु.स्मिता पेरके, विनोद आंबटकर, फरजाना शेख, राधिका बुक्कावार,यांची उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाचे सुरेख संचालन नलिनी अडेप्पवार यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार श्यामला बेलसरे यांनी मानले.विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने मूल तालुक्यातील अनेक कामगार बांधवांची नोंदणी कार्यक्रमस्थळी झाली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय समर्थ व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.कार्यक्रमाला कामगार बांधवांची उपस्थिती लक्षणीय होती.