Home Breaking News महाकाली नगरी,गणेश मंदिर कमेटी तर्फे गणेश वर्धापन व गणेश जयंती उत्साहात समारंभ

महाकाली नगरी,गणेश मंदिर कमेटी तर्फे गणेश वर्धापन व गणेश जयंती उत्साहात समारंभ

182

महाकाली नगरी,गणेश मंदिर कमेटी तर्फे गणेश वर्धापन व गणेश जयंती उत्साहात समारंभ

सुवर्ण भारत:पंकज रामटेक
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस :येथून काही अंतरावर म्हातारदेवी गावाच्या परिसरात महाकाली नगरी येथे गणेश जयंती व गणेश मुर्ती वर्धापन दिवस वर्ष ५वे उत्सवात साजरा करण्यात आला. सकाळी १० वाजता पुजा,हवन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रयास सखी मंच अध्यक्षा सौ.किरण विवेक बोढे,सरपंच (म्हतारदेवी) संध्या पाटील व अर्चना बोमले यांनी मार्गदर्शन केले.
तसेच कीर्तनकार ह.भ.प. दत्ता मसे महाराज यांच्या हस्ते वेकोली सेवानिवृत्त जेष्ठ नागरिक विठोबा बोधे,विलास धोटे,राजेश मिसाला यांना शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच विविध स्पर्धा घेण्यात आले.
ह.भ.प.दत्ता मसे महाराज यांचे जाहीर कीर्तन मोठ्या उत्साहात समारंभ करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष पुरुषोत्तम वडस्कर यांनी आभार व्यक्त केले.

महाप्रसाद वाटप करण्यात आले. सर्व परिसरातील नागरिक उपस्थित होऊन उत्साहात कार्यक्रमाची शोभा वाढवली.

यावेळी महाकाली नगरी गणेश मंडळ अध्यक्ष पुरुषोत्तम वडस्कर, उपाध्यक्ष अमोल खिरटकर, निखिल बोधे, सचिव संदीप चांबारे, कोषाध्यक्ष प्रमोद उपाध्ये, महिला कमेटी अध्यक्ष सौ. मंदा बोधे व उपाध्यक्ष सौ. किशोरी तातावार आदी उपस्थित होते.